Champions of Change Maharashtra Award esakal
मनोरंजन

Manoj Bajpayee : मनोज वाजपेयीला मिळाला 'Champions of Change Maharashtra' पुरस्कार, आणखी कोणत्या सेलिब्रेटींचा समावेश?

प्रसिद्ध अभिनेता मनोज वाजपेयीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

युगंधर ताजणे, सकाळ ऑनलाईन टीम

Champions of Change Maharashtra Award : प्रसिद्ध अभिनेता मनोज वाजपेयीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्याला नुकतेच 'Champions of Change Maharashtra' या पुरस्कारानं गौरविण्यात आले आहे. त्याच्यासह बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले आहे.

राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते चॅम्पियन्स ऑफ चेंज महाराष्ट्र या पुरस्काराचे वितरण करण्यात आले आहे. पुरस्कारार्थींना सुवर्ण पदक, आणि प्रशस्तीपत्रकर प्रदान करण्यात आले आहे. यावेळी न्यायमूर्ती के जी बालकृष्णन आणि ज्ञानसुधा मिश्रा यांना देखील चॅम्पियन्स ऑफ चेंज पुरस्कारानं गौरविण्यात आले आहे. याशिवाय आणखी कोणत्या सेलिब्रेटींना पुरस्कार प्रदान करण्यात आला याविषयी जाणून घेऊयात.

गेल्या काही दिवसांपासून या पुरस्कार सोहळ्याची चर्चा रंगली होती. अखेर हा सोहळा मुंबईमध्ये पार पडला आहे. त्याला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. बी टाऊनमधील अनेक सेलिब्रेटींच्या हजेरीत हा पुरस्कार सोहळा पार पडला आहे.

या सोहळ्यामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी, क्रिती सेनन, मनोज वाजपेयी यांचा खास गौरव करण्यात आला आहे. मनोजसह या सेलिब्रेटींचे पुरस्कार स्विकारतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून या सेलिब्रेटींवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. तसेच अर्जुन रामपाल, सोनू सूद सह फराह खान देखील हे देखील या सोहळ्याला उपस्थित होते.

फराहसोबत दिग्दर्शक राजकुमार हिरानी, फिल्ममेकर संदीप सिंह, दिग्दर्शक अब्बास मस्तान आणि क्रिकेटर सुनील गावस्कर यांना देखील यावेळी पुरस्कारानं गौरविण्यात आल्याचे दिसून आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

Dhairyasheel Mane, Ashokrao Mane : खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव मानेंना पंचगंगा प्रदूषण आमंत्रणचं नाही; चिडलेले आमदार माने काय म्हणाले

Kurla News: उलट्या, जुलाब, ताप आणि चक्कर..., कुर्ल्यात मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना विषबाधा

GATE 2027 Registration: आजपासून नोंदणी सुरू; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि परिक्षेची फी

Marathi News Live Updates : एका सक्षम पथकाची नियुक्ती केली आहे आणि सखोल चौकशी सुरू आहे - अहिर

SCROLL FOR NEXT