Manoj Bajpayee The Killer Soup Actor interview family Man i esakal
मनोरंजन

Manoj Bajpayee : फॅमिली मॅन मनोज वाजपेयीनं सांगितला 'फॅमिली प्रॉब्लेम'! 'बायको अन् लेक दोघीही मला...'

बॉलीवूडमध्ये आपल्या अनोख्या अन् वेगळ्या धाटणीच्या अभिनयामुळे (Manoj Bajpayee Bollywood Actor) नेहमीच कौतुकाचा विषय असलेल्या मनोजच्या त्या मुलाखतीनं नेटकऱ्यांची उत्सुकता वाढली आहे.

युगंधर ताजणे, सकाळ ऑनलाईन टीम

Manoj Bajpayee says daughter Ava, wife Shabana fight with him : बॉलीवूडमध्ये आपल्या अनोख्या अन् वेगळ्या धाटणीच्या अभिनयामुळे (Manoj Bajpayee Bollywood Actor) नेहमीच कौतुकाचा विषय असलेल्या मनोजच्या त्या मुलाखतीनं नेटकऱ्यांची उत्सुकता वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून मनोज चर्चेत आला आहे. त्याचे कारण त्याचा जोराम (Joram Movie) नावाचा चित्रपट आणि द किलर सूप (The Killer Soup Latest News) नावाची मालिका.

मनोजनं गेल्या तीन दशकांहून अधिक काळ त्याच्या अभियनयानं वेगळे स्थान चाहत्यांच्या मनात उमटविल्याचे दिसून आले आहे. सत्यापासून (Manoj Bajpayee Latest News) सुरुवात झालेल्या भिकु म्हात्रे उर्फ मनोजचा बॉलीवूडमधील प्रवास मोठा संघर्षमय आहे. त्यानं त्याच्या (Latest Bollywood News) आजवरच्या प्रवासात खूप काही अनुभव घेतले आहे. मध्यंतरी तो राजकारणात प्रवेश करणार अशा चर्चांना उधाण आले होते. यानंतर तो त्याच्या मुलाखतीमध्ये चर्चेत आहे.

५४ वर्षीय मनोजनं त्याच्या आजवरच्या करिअरमध्ये खूप वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका केल्याचे दिसून आले आहे. त्यानं कॉमेडी ते पॉलिटिकल अशा भूमिका करत चाहत्यांना जिंकून घेतले आहे. फॅमिली मॅन सीरिजमधून त्यानं ओटीटीवर इंट्री केली आणि ती मालिका भारतातील सर्वाधिक लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणून ओळखली जाते. मनोजच्या त्या मालिकेचे दोन सीझन प्रदर्शित झाले आहेत.

मनोजल्या त्या वरुन विचारण्यात आलेल्या प्रश्नावर त्यानं एक फॅमिली प्रॉब्लेम सांगितला. इंडियन एक्सप्रेसनं मनोजच्या घेतलेल्या त्या मुलाखतीतून त्यानं वेगवेगळ्या प्रश्नांना बिनधास्त अंदाजात उत्तरं दिली आहेत. तो म्हणतो, ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणं आणि त्यातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणे ही वेगळी गोष्ट आहे. त्यातून खूप काही नव्यानं शिकायला मिळाले. ते एक प्रभावी माध्यम आहे. फॅमिली मॅनच्या अनेक आठवणी आहेत.

मनोज म्हणतो माझ्या कुटूंबात मुलगी अवा आणि पत्नी आमच्यात होणाऱ्या भांडणाचा विषय हा मला त्यांना वेळ देता न येणं हा आहे. त्यामुळे त्या नेहमीच माझ्यावर चिडलेल्या असतात. त्यांना माझ्याकडून वेळ हवा असतो. तो मी त्यांना द्यावा अशी त्यांची इच्छा असते. मी माझ्या प्रोजेक्टमध्ये एवढा असतो की, मला त्यांना वेळ देणं शक्य नसते, त्यामुळे बायको अन् मुलगी यांना माझी ती गोष्ट अजिबात आवडत नाही.

मनोजच्या प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास त्याच्या यापूर्वीच्या जोराम नावाच्या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर त्याची नेटफ्लिक्सवर किलर सूप नावाची मालिका प्रसिद्ध झाली आहे. ती सध्या ट्रेडिंगचा विषय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

ती खूपच बारीक, काळी-सावळी... प्रियांका चोप्राला पहिल्यांदा पाहिल्यावर थक्क झालेली मराठी अभिनेत्री; म्हणाली- ती हिरोईन बनायला आलेली...

FASTag Annual Pass: FASTag वार्षिक पास घ्यायचा विचार करताय? मग घेण्यापूर्वी 'हे' 11 महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची सविस्तर उत्तरं जरूर वाचा!

Magnesium & Vitamin D Deficiency: व्हिटॅमिन-D ची पातळी कमी होण्यामागे असू शकतो 'या' खनिजांचा अभाव, 'हे' अन्नपदार्थ ठरतील उपयुक्त

SCROLL FOR NEXT