Manoj Bajpayee Google
मनोरंजन

Manoj Bajpayee ची चाहत्यांना कळकळीची विनंती, म्हणाला,'माझ्यासोबत संवाद थांबवा..', काय घडलं नेमकं?

मनोज वाजपेयीनं आपल्या इन्स्टा स्टोरीत पोस्ट करत चाहत्यांना त्याच्यासोबत काय घडलं आहे याची माहिती दिली आहे.

प्रणाली मोरे

Manoj Bajpayee : मनोज वाजपेयीनं इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक नोट शेअर करत त्याच्या चाहत्यांसोबत एक महत्त्वाची माहिती शेअर केली आहे. मनोजनं त्याचं ट्वीटर अकाउंट हॅक झाल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे मनोजनं आपल्या चाहत्यांना कळकळीची विनंती करत सध्या काही दिवस माझ्याशी ट्वीटरवर संवाद साधू नका असं म्हटलं आहे.(Manoj Bajpayee Insta story post viral)

मनोज वाजपेयीनं शुक्रवारी ६ जानेवारी,२०२३ रोजी सकाळी आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलं होतं, ''माझं ट्वीटर अकाउंट हॅक झालं आहे. कृपया आज माझ्या प्रोफाईलवर येणाऱ्या कोणत्याही गोष्टीला क्लीक करु नका...संवाद साधू नका..जोपर्यंत समस्येचं निवारण होत नाही. सध्या त्या संबधित काम सुरु आहे. आपल्याला समस्या सोडवली की की सूचित करण्यात येईल''.

अद्याप मनोज वायपेयीच्या ट्वीटर अकाउंटवर कोणतीही चुकीची गोष्ट घडल्याचं समोर आलेलं नाही. ज्या पोस्ट दिसत आहेत त्या गुरुवार पर्यंतच्या आहेत. यातील एक पोस्ट रिट्वीट केली आहे. ज्यामध्ये मनोज वाजपेयीनं जॉन अब्राहमसोबतच्या त्याच्या 'सत्यमेव जयते २' सिनेमाला पाहण्याचं आवाहन चाहत्यांना केलं आहे. आणि त्यातली दुसरी पोस्ट दिल्ली वाढलेल्या थंडीच्या तापमाना संदर्भात आहे. तसंच,या गुरुवारच्या पोस्टमध्ये चाहत्यांनी मनोजच्या टाइमलाइनवर त्याच्या आधीच्या कामाची प्रशंसा केलेले रीट्वीट दिसत आहेत.

Manoj Bajpayee insta story image

मनोज वाजपेयी सध्या ५२ व्या इटरनॅशनल फिल्म फॅस्टिवल रॉटरडॅम मध्ये पार पडणाऱ्या आपल्या 'जोराम' सिनेमाच्या प्रीमियरच्या प्रतिक्षेत आहे. 'जोराम' सिनेमाचं दिग्दर्शन देवाशीष मखीजानं केलं आहे. हा सिनेमा थ्रीलर आहे. या सिनेमात मनोज वाजपेयी सोबत तनिष्ठा मुखर्जी,स्मिता तांबे, मेघा माथुर,राजश्री देशपांडे सारखे कलाकारही आपल्याला दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT