Manoj Bajpayee’s Mother Passes Away After Prolonged Illness  sakal
मनोरंजन

Manoj Bajpayee’s Mother Passes Away: अभिनेता मनोज वाजपेयीच्या आईचे निधन..

बॉलीवुडमधील अभिनेता मनोज वाजपेयीच्या आईचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे.

नीलेश अडसूळ

बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मनोज वाजपेयीच्या आई गीता देवी यांचे निधन झाले आहे. आज गुरुवार ८ डिसेंबर रोजी दिल्ली येथे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे दीर्घ आजाराने निधन झाले असून त्यांचे वय ८० वर्षे होते.

(Manoj Bajpayee’s Mother Passes Away After Prolonged Illness)

गीता देवी गेली दिवस आजाराने ग्रस्त होते. दिल्लीतील पुष्पांजली मेडिकल सेंटर या रुग्णालयात त्यांना दाखल देखील केले होते. परंतु तब्येतील सुधारणा झाल्याने त्यांना पुन्हा घरी पाठवण्यात आले. त्यांच्यावर घरातच औषधोपचार सुरू होते, परंतु अचानक त्यांची प्रकृती ढासळली आणि त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्याच वर्षी मनोज वाजपेयी यांच्या वडिलांचे निधन झाले होते. आता त्यांच्या आईचेही निधन झाल्याने वाजपेयी यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मनोरंजन विश्वामध्ये मनोजने आजवर अनेक नावीन्यपूर्ण भूमिका करून मोठी लोकप्रियता मिळवली आहे. वेब सिरिजच्या दुनियेत तर त्याचा हात कुणीही धरू शकत नाही. त्याला पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. 'सत्या' मधला भिकु म्हात्रे ते आताचा फॅमिली मॅन अशा त्याच्या सगळ्या भूमिकांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. आज त्याच्या आईचे निधन झाले असून त्याने मोठा आधार गमावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT