Trisha Krishnan-Mansoor Ali Khan Dispute  esakal
मनोरंजन

Trisha Krishnan Row : अभिनेत्री त्रिशावर आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या अभिनेता मन्सूरला कोर्टाचा दणका, जामीन फेटाळला!

थलापती विजयच्या लिओ चित्रपटामध्ये चमकलेल्या मन्सूर अली खान हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आला आहे.

युगंधर ताजणे

Trisha Krishnan-Mansoor Ali Khan Dispute : थलापती विजयच्या लिओ चित्रपटामध्ये चमकलेल्या मन्सूर अली खान हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आला आहे. त्यानं लोकप्रिय अभिनेत्री त्रिशा कृष्णननं वर आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यामुळे त्याच्यावर नेटकऱ्यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिल्या होत्या.

मन्सूर अली खानच्या त्या प्रतिक्रियेवर प्रसिद्ध अभिनेते चिरंजीवीनं देखील नाराजी व्यक्त केली होती. आपण अशा प्रकारच्या प्रतिक्रियेचे समर्थन करत नाही. कोणत्याही अभिनेत्रीच्या विरोधात जर कुणी बोलत असेल तर आपण त्याच्या विरोधात उभे राहणार. मन्सूरनं जे वक्तव्य केले ते त्यानं त्याच्या भोवतीच्या प्रसिद्धीच्या झोतात राहून केले असेही चिरंजीवीनं म्हटले आहे.

Financial Freedom महिलांना का हवे कुटुंबाच्या गुंतवणुकींचे आणि आर्थिक व्यवहारांचे ज्ञान?

या सगळ्यात एक मोठी बातमी समोर आले आहे. त्यामध्ये मन्सूर अलीला सेशन कोर्टानं मोठा दणका दिला आहे. त्यानं जामीनासाठी केलेला अर्ज हा फेटाळून लावला आहे. यानंतर मन्सूरला केव्हाही अटक होऊ शकते अशा चर्चेला उधाण आल्याचे सांगण्यात येत आहे. त्रिशानं देखील यापुढील काळात आपण त्या कलाकारासोबत काम करणार नाही. असे सांगितले होते. एवढं होऊन देखील मन्सूरनं आपण काही केलं तरी माफी मागणार नाही असे म्हटले होते. यानंतर मात्र त्याचा सूर मावळल्याचे दिसत आहे.

ज्यावेळी ते आक्षेपार्ह ट्विट समोर आले होते त्यानंतर काही वेळातच मन्सूरच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती. आता मन्सूरनं अभिनेत्री त्रिशाची माफी मागितल्याचे दिसून आले आहे. रमेश बाला यांनी एक्सवर एक पोस्ट शेयर केली आहे. ज्यामध्ये म्हटले आहे की, मन्सूरचे स्टेटमेंट आहे. तो म्हणतो, त्रिशा मला माझ्या विधानााठी माफ कर. मी आता तुला तुझ्या लग्नात आशीर्वाद देईल. आमीन..अशा शब्दांत मन्सूरनं आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मन्सूर अली खाननं म्हटलं होतं की, मला तेव्हा माहिती झाले, मी त्रिशासोबत काम करणार आहे तेव्हा मला वाटले तो बेडरुम सीन असेल. मी त्रिशाला घेऊन बेडरुममध्ये जाईल आणि मी बाकीच्या अभिनेत्रींसोबत जे सीन केले तसेच मी तिच्यासोबतही करेन. मी पहिल्यांदा देखील असे सीन केले आहेत. ही काही माझ्यासाठी नवीन गोष्ट नव्हती. या वक्तव्यामुळे मन्सूर अली खान चर्चेत आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तारापूर एमआयडीसीत वायू गळती; चार कामगारांचा मृत्यू; दोघांची प्रकृती चिंताजनक

Plane Service : मोठी बातमी! सोलापूर ते मुंबई विमानसेवा सप्टेंबरपासून होणार सुरू; 'डीजीसीए'कडून स्टार एअरला परवानगी

NCP News: सुनेत्रा पवार संघाच्या कार्यक्रमात, रोहित पवार भडकले, काय म्हणाले?

Beed News: सरकारी वकिलाचं टोकाचं पाऊल, कुटुंबाच्या मागणीने मोठा ट्विस्ट, बीड हादरलं..

Pune News : ठेकेदारावर पीएमपीने कारवाई केली, महापालिका कधी करणार? मनसेचा महापालिकेला प्रश्‍न

SCROLL FOR NEXT