manushi chhillar represent india in london fashion week 2023 SAKAL
मनोरंजन

Manushi Chhillar: विश्वसुंदरी मानुषी छिल्लर लंडनमध्ये करणार भारताचं प्रतिनिधित्व, फॅशन वीकमध्ये दाखवणार जलवा

मानुषी ही लंडनमध्ये फॅशन शोमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे

Devendra Jadhav

Manushi Chhillar News: मानुषी छिल्लर ही भारतीय मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. मानुषीने २०१७ ला मिस वर्ल्डचा किताब पटकावून संपूर्ण जगाचं लक्ष तिच्याकडे वळवलं.

मानुषी छिल्लर लंडनमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. लंडन वीक 2023 च्या फॅशन वीकमध्ये मानुषी भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे.

(manushi chhillar represent india in london fashion week 2023)

मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर सध्या एका खास कारणांमुळे चर्चेत आहे. बॉलीवूड अभिनेत्री मानुषी लंडन फॅशन वीक 2023 मध्ये तिने पदार्पण केलं आहे. सगळ्या भारतीयांसाठी हि बाब नक्कीच अभिमानास्पद आहे.

मानुषी छिल्लर म्हणते "जेव्हा आपण स्पर्धांमध्ये प्रवेश करतो तेव्हा आपण काय तयारी करावी आणि स्वतःला लोकांसमोर कसे सादर करावे यावर लक्ष केंद्रित करतो. पण जेव्हा स्पर्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर जाते जेव्हा तुम्ही आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आपल्या मातृभूमीचे प्रतिनिधित्व करताना येणारी जबाबदारी आणि अभिमान याची मला जाणीव आहे."

मानुषी छिल्लरसाठी हा एक फॅशन वीक नसून भारताला एका नव्या उंचीवर घेऊन जाण्याची गोष्ट आहे. देशाची समृद्ध संस्कृती, विविधता आणि प्रतिभा जगासमोर दाखवण्याबद्दल मानुषी आग्रही आहे. राष्ट्राचे प्रतिनिधित्व करणे हा एक सन्मान आहे, जो मोठ्या जबाबदारीसह येतो असं मानुषीला वाटतं.

मानुषी छिल्लरने सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर तिच्या फॅशनने प्रेक्षकांना मोहित करत असून "द ग्रेट इंडियन फॅमिली " या बहुप्रतिक्षित चित्रपटात विकी कौशलसोबत ती दिसणार आहे.

कधी रिलीज होणार द ग्रेट इंडियन फॅमिली सिनेमा?

 द ग्रेट इंडियन फॅमिली ट्रेलर मधून मानुषी छिल्लरच्या अभिनयाने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले आहेत. पण आता सगळेच हा चित्रपट मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी उत्सुक आहेत. मानुषीच्या मनमोहक अदा " द ग्रेट इंडियन फॅमिली " सिनेमात बघायला मिळणार आहेत

मानुषी आणि विकीचा द ग्रेट इंडियन फॅमिली 22 सप्टेंबर रोजी रिलीज होणार असुन एक उत्तम सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत कोट्यवधींचं घर विकलं अन् घेतली बाईक! कारण काय? स्टार्टअप फाउंडरने सांगितली धक्कादायक निर्णयामागची कहाणी

WTC 2025-27: भारतीय संघाचं गणित बिघडलं! श्रीलंकेविरुद्धच्या 'ड्रॉ'नंतर Points Table मध्ये टीम इंडिया कोणत्या स्थानावर

शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करा, संयुक्त जमीन मोजणीला गती द्या; शक्तिपीठ महामार्गाबाबत आवाहन

Marathi News Live Updates : पुण्यातील नऱ्हेतील भूमकर चौक ते श्री कंट्रोल चौकदरम्यान १२ हजार ४०० चौरस फुटांवरील अतिक्रमणे हटविली

Encroachment : नऱ्हेतील भूमकर चौक ते श्री कंट्रोल चौकदरम्यान १२ हजार ४०० चौरस फुटांवरील अतिक्रमणे हटविली

SCROLL FOR NEXT