maratha reservation andolan victory manoj jarange patil kiran mane caution post SAKAL
मनोरंजन

Maratha Reservation: "हे फक्त निवडणुकांसाठीचे गाजर...!", किरण मानेंनी मराठ्यांना केलं सावध

किरण मानेंनी पोस्ट करुन मराठा आरक्षणाविषयी सर्वांना सावध केलंय

Devendra Jadhav

Kiran Mane on Maratha Reservation News: किरण माने हे मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते. किरण माने विविध सामाजिक, राजकीय विषयांवर पोस्ट करत असतात.

गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला माने पाठिंबा देत आहेत. ते सोशल मीडियावर याविषयी विविध पोस्ट करत आहेत. अशातच त्यांनी आज मराठ्यांना सावध केलं आहे.

किरण मानेंनी सोशल मीडियावर पोस्ट करुन लिहीलंय की, "मराठा बांधवांनो, तहात हारू नका.
"...सदर अध्यादेश १६ फेब्रूवारी २०२४ पासून किंवा त्यानंतर लागू होईल." आणि "...यामुळे बाधित व्यक्ती दरम्यानच्या काळात आपल्या हरकती, सूचना संबंधितांकडे नोंदवू शकतील, ज्या विचारत घेण्यात येतील." हा तिढा लै लै लै महत्त्वाचा आहे.
निव्वळ निवडणुकांसाठीचे हे गाजर आहे. जागे रहा.
एक मराठा लाख मराठा"

आरक्षणाविषयी भुजबळ काय म्हणाले?

मराठा समाजाच्या आरक्षविषयी भुजबळ म्हणाले, "मराठा समाजाचा विजय झाला असं वाटतंय पण मला तसं काही पूर्ण पणे वाटत नाही. अशा प्रकारे झुंडशाहीने नियम, कायदे बदलता येत नाहीत. आम्ही शपथ घेताना कोणालाही न घाबरता काम करु अशी शपथ घेतो. पण, आता जे झालं आहे ती एक सूचना आहे. याचे रुपांतर नंतर होईल"

भुजबळ पुढे म्हणाले, "सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशावर १६ फेब्रुवारीपर्यंत हरकती मागवण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील ओबीसी समाजाचे आणि इतर समाजातील वकील असतील त्यांनी याचा अभ्यास करुन यावर हरकती लाखोंच्या संख्येने पाठवाव्यात. जेणेकरुन सरकारला लक्षात येईल ही याबाबत दुसरीही बाजू आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water Crisis : मुंबईवर अभूतपूर्व पाणी संकट ! जलाशयांत केवळ १० टक्के पाणीसाठा; बांधकाम, जलतरणचा पाणीपुरवठा आजपासून बंद

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयात कर्मचाऱ्यांचे आंदोलन

PM Kisan 23rd Installment: 23व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली! 2,000 रुपये कधी खात्यात येणार? थेट कृषिमंत्र्यांनीच सांगितली तारीख

SC Reservation Subclassification : अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाबाबत एक लाखांहून अधिक हरकती, सरकार घाईगडबडीत निर्णय घेणार नाही; मंत्री शिरसाट यांची ग्वाही

Satara Accident: दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्याचे स्वप्न अधुरे! बनपुरीजवळ दुचाकी-पिकअपची समोरासमोर धडक; १६ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT