marathi actor Akshay Kelkar wins MHADA lottery mumbai, gets emotional sharing post  SAKAL
मनोरंजन

Akshay Kelkar: मराठी अभिनेत्याला लागली म्हाडाची लॉटरी, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला, "हे सगळं स्वप्नवत..."

मराठी अभिनेत्याला म्हाडाचं घर मिळाल्याने त्याचं स्वप्न पूर्ण झालंय

Devendra Jadhav

Akshay Kelkar News: मुंबईसारख्या शहरात स्वतःचं हक्काचं घर असणं हे प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं. असंच स्वप्न एका मराठी अभिनेत्याने पाहिलं आणि त्याचं ते स्वप्न पूर्णही झालं. हा कलाकार म्हणजे अक्षय केळकर. अक्षयने बिग बॉस मराठी ४ चं विजेतेपद पटकावलं आहे.

आता अक्षयने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत घर मिळाल्याची आनंदाची बातमी सर्वांसोबत शेअर केलीय.

अक्षयने सोशल मीडियावर याविषयी पोस्ट शेअर केलीय.

अक्षय लिहीतो, "माझं पहिलं घर - तेही मुंबईत !!!!
2023 मध्ये सगळ्या सुंदर गोष्टी आयुष्यात घडल्या, त्यातली खूप सुंदर आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मुंबईत माझं स्वतःच “घर” !!!
काही वर्षांपूर्वी जेव्हा या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली, तेव्हा माझ्या ५ मित्रांसोबत, म्हाडा च्या बिल्डिंग मध्ये रूम शेअर करून भाड्याने राहत होतो. त्याच म्हाडाच्या मुंबई च्या प्रकल्पामध्ये या वर्षी अर्ज केला होता आणि सोडतीमध्ये विजेता ठरलो!"

अक्षय पुढे लिहीतो, "स्वप्नवत आहे पण, मला हवा तसा view मिळाला आहे. ज्यातून मी रोज चमकणाऱ्या, धावणाऱ्या मुंबईला बघू शकतो.
सगळी जमवाजमव, कागदपत्र, loan, तयारी आणि खूप मोठी, किचकट पण हवीहवीशी procedure... म्हाडाच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मनापासून धन्यवाद! ही सगळी procedure पार पाडताना तुमची खूप मदत मिळाली आणि तुमच्यातला positive approach खरोखर कौतुकास्पद आहे. तुमच्या साथीमुळे घराचा आनंद द्विगुणित झाला."

अक्षय शेवटी लिहीतो, "तर, आज माझ्या घराची चावी हातात आली!
या वर्षाची सुरुवात आणि शेवट दोन्ही “विजेता” अशी होते आहे, ही मालिका या पुढे अशीच सदैव सुरू राहू दे
तर अश्या प्रकारे, मुंबईत स्वतःच घर झालं!
Extremely happy to share that, I Bought my first house in Mumbai."

या खास बातमीबद्दल चाहत्यांनी अक्षयला कमेंटमध्ये शुभेच्छा दिल्यात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT