Breathe
Breathe 
मनोरंजन

'ब्रीद'च्या सीझन-2 मध्ये दिसणार 'हा' मराठमोळा अभिनेता, सीझन-1 मध्ये पाडली होती कडक छाप

सकाळवृत्तसेवा

मुंबई : आर. माधवनची प्रमुख भूमिका असलेल्या ‘ब्रीद’(Breathe) या वेबसिरीजचा पहिला सिझन खूप गाजला. आता दुसरा सीझन येत आहे आणि त्यामध्ये अभिषेक बच्चनबरोबर हृषिकेश जोशी महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. पहिल्या सीझनमधील हृषिकेशच्या कामाचे सर्व प्रेक्षकांनी खूप कौतुक केले. त्यामुळे  दुसऱ्या सिझनमध्ये हृषिकेशच्या भूमिकेमध्ये काही चांगले बदल करून ती महत्वाची केली गेली आहे. दुसऱ्या सिझनमध्ये हृषिकेशचा इन्स्पेक्टर प्रकाश अक्षरशः धमाल करणार आहे. हा सीझन अॅमॅझॉनवर प्राईमवर १० जुलै रोजी दाखल होत आहे.

ॲबंडंशिया एन्टरटेन्मेंटची निर्मिती आहे. मयांक शर्मा दिग्दर्शक आहेत. भवानी अय्यर, विक्रम टुली आणि अर्षद सय्यद यांनी या मालिकेचे लेखन केले आहे. ऋषिकेश सांगतो, की ‘ब्रीद -2’  या सिझनचे जे ट्रायल शो झाले, त्यावेळी हृषिकेश जोशीच्या इन्स्पेक्टर प्रकाशच्या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांची खूप मोठी दाद मिळाली. दुसऱ्या सिजनमधील कोणत्या व्यक्तिरेखा तुम्हाला तिसऱ्या सिझनमध्ये पाहायला आवडतील ? असा प्रश्न  एका सर्वेक्षणात प्रेक्षकांना विचारला असता, हृषिकेश जोशीचं नाव पहिल्या दोनात आलेलं आहे.

तो पुढे म्हणाला, की अलीकडे आम्ही सिझन दोनच्या भागांचे डबिंग करत होतो. त्यावेळी मला अभिषेक बच्चन म्हणाले, की तुझे कॅरेक्टर हे या सीजनमधील सरप्राईझ पॅकेज असणार आहे. माझ्यासाठी ही  सर्वात मोठी कॉम्प्लीमेंट होती. या सिझनच्या चित्रिकरणादरम्यान माझी आणि अभिषेक बच्चन यांची खूप चांगली मैत्री झाली. आम्ही एकत्रच जेवायचो,  सेटवर खूप क्रिकेट खेळायचो. खूप गप्पा मारायचो. ते खूप गप्पिष्ट आहेत,  त्यांना गोड खूप आवडते आणि मलाही. त्यांनी एकदा खास माझ्यासाठी जयाजींनी बनविलेला गाजराचा हलवा आणला होता. 

Marathi actor to appear in season 2 of Breath had a strong impression in season 1

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: विराटचा डायरेक्ट थ्रो अन् गुजरातचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

Latest Marathi News Live Update: बाळासाहेबांना हिंदूहृदयसम्राट म्हणा- उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT