marathi actor hardeek joshi emotional about jau bai gavat reality show zee marathi  SAKAL
मनोरंजन

Hardeek Joshi: "ती खंत कायम मनात राहील", हार्दीक जोशीने सांगितला भावूक करणारा किस्सा

हार्दीक जोशी सध्या जाऊ बाई गावात या शोचं सूत्रसंचालन करतोय

Devendra Jadhav

Hardeek Joshi News: हार्दीक जोशी हा सध्या झी मराठीवरील जाऊ बाई गावात या शोचं सुत्रसंचालन करतोय. हार्दीकचा हा शो सध्या चांगलाच चर्चेत आहे. नवीन शो आणि आगळीवेगळी संकल्पना असलेला हा शो सध्या प्रेक्षकांच्या चांगल्या पसंतीस उतरला आहे.

हार्दीक जोशीने या शोनिमित्त एका मुलाखतीत एक भावूक किस्सा शेअर केलाय. काय म्हणाला हार्दीक बघा.

जाऊ बाई गावात हा शो स्वीकारताना हार्दीक जोशीच्या घरच्यांची काय प्रतिक्रिया होती? याबद्दल हार्दीक म्हणाला, "माझ्यासाठी हा शो माझ्या हृदयाच्या अगदी जवळचा आहे . माझी वाहिनी खूप आजारी होती आणि मी ह्या शो मधून आपले पाऊल मागे घेत होतो. पण जेव्हा माझ्या वाहिनीला समजले की मी 'जाऊ बाई गावातला' नकार द्यायला जात होतो, तेव्हा हॉस्पिटल मध्ये तिने तिच्या हातात माझा हात घेतला आणि माझ्याकडून वचन घेतले की हा शो तू सोडायचा नाही."

हार्दीक जोशी पुढे म्हणाला, "कारण वहिनीला माहिती आहे की, मी कामातून कधी माघार घेत नाही, तर तिचं म्हणणं होते की जी गोष्ट आज पर्यंत नाही केली ती ह्या पुढे ही करायची नाही. हा शो मी फक्त तिच्यामुळे करतोय आणि योगायोग असा कि 'जाऊ बाई गावातचा' पहिला एपिसोड तिच्या वाढदिवसाच्या दिवशी प्रसारित झाला. पण मला नेहमी खंत राहील की कार्यक्रमाचा पहिला एपिसोड बघायला ती ह्या दुनियेत नव्हती. मी माझ्या प्रत्येक दिवसाची सुरूवात तिला नमस्कार करून करतो."

झी मराठीवरील जाऊ बाई जोरात हा आगळावेगळा रिअॅलिटी शो सोमवार ते शनिवार रात्री ९.३० वाजता झी मराठीवर बघायला मिळतोय.

तुझ्यात जीव रंगला फेम हार्दीक जोशी या शोचं सूत्रसंचालन करतोय. सध्या झी मराठीवरील या आगळ्यावेगळ्या शोला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळतेय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Case : लोहगड खूनप्रकरणातील व्यावसायिक केतन अग्रवाल यांचे आजोबा देवीचंद अग्रवाल यांचे उपचारादरम्यान निधन

IND vs ENG, 2nd T20I: रवी बिश्नोईची 'ती' चूक महागात पडली! जेकब बेथलच्या आक्रमणामुळे भारताविरुद्ध इंग्लंडचा ऐतिहासिक विजय

IND vs ENG, 2nd T20I: अक्षर पटेलने इंग्लंडच्या कॅप्टनला आऊट करत घडवला इतिहास; यापूर्वी कोणत्याही भारतीय फिरकीपटूला जमलं नव्हतं!

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

SCROLL FOR NEXT