Marathi Actor Lalit Prabhakar Comment on kshitee Jog Photo,Sunny Movie Instagram
मनोरंजन

Lalit Prabhakar: 'मुलगी शिकली प्रगती झाली, जास्त शिकली...', ललित प्रभाकरच्या पोस्टनं वेधलं लक्ष

ललित प्रभाकर सध्या त्याच्या 'सनी' सिनेमामुळे जोरदार चर्चेत आहे.

प्रणाली मोरे

Lalit Prabhakar: ललित प्रभाकर हा त्याच्या हॅन्डसम लूकमुळे तरुणींच्या हृद्याची धडकन आहे असं म्हटलं तर नक्कीच अतिश्योक्ती ठरणार नाही. त्यानं आतापर्यंत केलेल्या सिनेमांपेक्षा त्याच्या लूकमुळे तो लोकांच्या अधिक लक्षात राहिला. 'जुळूनी येती रेशीमगाठी' या त्याच्या आणि प्राजक्ता माळीच्या मालिकेत दोघांची जोडी भलतीच लोकांना पसंत पडलेली. प्राजक्तासोबत त्याचं अफेअर आहे अशा चर्चाही रंगल्या तेव्हा. त्यानंतरही ललितचं अनेक अभिनेत्रींशी नाव जोडलं गेलं. पण प्रत्येक वेळेस ललितनं आपण सिंगल आहोत आणि त्यातच सुख आहे असं स्पष्ट मत व्यक्त केलं. आता तो चर्चेत आहे त्याच्या 'सनी' सिनेमामुळे.(Marathi Actor Lalit Prabhakar Comment on kshitee Jog Photo,Sunny Movie)

ललित सध्या सोशल मीडियावर आधीपेक्षा अधिक चर्चेत पहायला मिळतो. तो सध्या रोज काहीतरी हटके पोस्ट करत आहे. आताही त्यानं क्षिती जोग सोबतचा एक फोटो पोस्ट करत त्याला कॅप्शन दिलं आहे, ''मुलगी शिकली प्रगती झाली,जास्त शिकली प्रोड्यूसर झाली''. आता हे त्यानं फक्त यासाठी लिहिलं आहे की,क्षिती जोग सनी सिनेमाची निर्माती आहे,ज्यात ललित महत्त्वाच्या भूमिकेत काम करत आहे. पण या त्याच्या पोस्टवर लोकांनी मात्र वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

सनीचा ट्रेलरही नुकताच प्रदर्शित झाला. एकंदर ट्रेलर पाहून लक्षात येते की कूल, बिनधास्त, स्वच्छंदी आयुष्य जगणारा 'सनी' जेव्हा शिक्षणासाठी घरापासून दूर परदेशात जातो, तेव्हा त्याची स्वावलंबी होण्यासाठीची धडपड यात दिसत आहे. सुखवस्तू घरातून आलेल्या 'सनी'ला परदेशातील परिस्थितीशी जुळवून घेताना त्रास होत आहे.

अनेक गोष्टींना सामोरे जात असतानाच त्याला घरच्यांचे महत्व कळत आहे. लांब गेल्यावरच जवळचं सापडतं, असाच काहीसा अनुभव 'सनी'ला येत असल्याचे दिसतेय. 'सनी'ने अशी कोणती चूक केली, ज्याची त्याला अशी शिक्षा भोगावी लागत आहे, 'सनी'च्या मनातली तगमग नेमकी कसली आहे, सनी पुन्हा मायदेशी येणार की परदेशातच राहणार, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला १८ नोव्हेंबरला मिळणार आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

क्रिकेटचा देव 'सचिन' जेव्हा फुटबॉलचा सुपरस्टार मेस्सीला भेटला, 10 नंबरची जर्सी देताना काळ थांबला… वानखडेवरील 'तो' क्षण Viral

Latest Marathi News Live Update: स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी वानखेडे स्टेडियममधून रवाना

Baramati Politics:'बारामतीत राष्ट्रवादी व भाजपचे परस्परांवर आरोप प्रत्यारोप'; उपमुख्यमंत्र्यांच्या घरासमोरील आंदोलनाचे उमटले राजकीय पडसाद..

Google Search : रात्रीच्या वेळेस पुरुष गुगलवर सगळ्यात जास्त काय सर्च करतात? 2025 च्या नव्या रिपोर्टने दुनिया हादरली

Raju Shetti: शक्तीपीठ महामार्ग रेटण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा अटापिटा: राजू शेट्टींचा आरोप; टेंडरसाठी बड्या कंपन्यांकडून घेतला ॲडव्हान्स ?

SCROLL FOR NEXT