milind dastane 
मनोरंजन

'ही तर लूटच'; मुंबई-पुणे प्रवासाच्या टोलवरुन मिलिंद दास्तानेंचा संताप

या प्रवासादरम्यान अनेकजण लोणावळ्यात ब्रेक घेतात. मात्र यापुढे हा ब्रेक घेताना विचार करावा लागणार आहे.

स्वाती वेमूल

मुंबई-पुणे Mumbai-Pune प्रवास करताना अभिनेते मिलिंद दास्ताने Milind Dastane यांना आलेला एक अनुभव त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून सांगितला आहे. या प्रवासादरम्यान अनेकजण लोणावळ्यात ब्रेक घेतात. मात्र यापुढे हा ब्रेक घेताना दोनवेळा विचार करावा लागणार आहे. तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील राणादाच्या वडिलांची भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद दास्ताने यांनी त्यांचा हा अनुभव सांगितला आहे. त्याचसोबत नागरिकांना जागरुक राहण्याचं आवाहन केलं आहे.

"काही कामानिमित्त मी मुंबईहून पुण्याला गेलो होतो. जाताना आधी खालापूर टोल नाक्यावर फास्ट टॅगमधून २०३ रुपये आणि पुढे तळेगाव टोल नाक्यावर ६७ रुपये असे एकून २७० रुपये कापले गेले. टोलचे पैसे कापल्याबद्दल माझा आक्षेप नाही. पुण्यात काम आटोपून पुन्हा मुंबईला परतत असताना तळेगाव टोलनाक्यावर २०३ रुपये कापले गेले. त्यानंतर येणाऱ्या टोलवर ६७ रुपये कापले जाणार या हिशोबाने तेवढे पैसे माझ्या फास्ट टॅग अकाऊंटमध्ये होते. तळेगावचा टोल भरल्यानंतर पुढे येताना आम्ही लोणावळ्यात खाली उतरून ब्रेक घ्यायचं ठरवलं. थोडं थांबून पुन्हा मुंबईच्या दिशेने बाहेर पडताना टोलवर १३५ रुपये फास्ट टॅगमधून कापले गेले. तिथून एक्स्प्रेस वेवर आलो. त्यावेळी फास्ट टॅग अकाऊंटमधील पैसे कमी असल्याचं दाखवलं आणि पुन्हा २०३ रुपये घेण्यात आले. हा संपूर्ण प्रकार संतापजनक आहे. खरंतर टोलचे पैसे २७० रुपये झाले पाहिजे होते. पण पुण्यातून मुंबईला येता येता माझे आधी २०३, नंतर १३५ रुपये कापले गेले. ही एकप्रकारची लूट आहे", असं त्यांनी सांगितलं.

याबाबत दास्ताने यांनी खालापूर टोल नाक्यावर जाब विचारला असता गेल्या दहा दिवसांपासून हा नवा नियम असल्याचं त्यांना सांगण्यात आलं. "लोणावळ्यात तासभर ब्रेक घेतला म्हणून एक्स्प्रेस वेचा आधी काढलेला टोल रद्द करणं याला अर्थच नाही. याविरोधात मी तिथल्या तक्रार वहीत रितसर लेखी तक्रार नोंदवून आलो आहे. मुंबई-पुणे प्रवास करताना अनेकजण लोणावळ्यात ब्रेक घेतात. तासभर थांबून पुन्हा प्रवासाला निघतात. अशा वेळी त्यांच्याकडून १३५ रुपये टोल आणि पुन्हा एक्स्प्रेस वेवर २०३ रुपयांचा टोल घेणं अन्यायकारक आहे", असं ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अहमदाबाद सारखी घटना, विमान धावपट्टीवर असतानाच लागलेली आग, उड्डाणानंतर लगेच कोसळलं; धक्कादायक VIDEO समोर

ऐतिहासिक निकाल! 'अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार'; नराधमाला ‘मृत्यूपर्यंत जन्मठेप’; वाशीम न्यायालयाचा निकाल..

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर दौऱ्यावर, विमानतळावर आगमण

Guru Nanak Jayanti 2025: गुरु नानक जयंतीनिमित्त आपल्या प्रियजनांना पाठवा मंगल शुभेच्छा!

Alcohol Effects on Brain: दारूचा एक घोटही ठरतो मेंदूसाठी मोठा फटका! न्यूरोलॉजिस्ट्सने दिला गंभीर इशारा

SCROLL FOR NEXT