prasad oak  team esakal
मनोरंजन

माझ्या इंस्टावर आठवडाभर मदतकार्याचीच चर्चा, प्रसाद ओकची पोस्ट

मात्र मराठी चित्रपट सृष्टीतील वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी या घटनेची नोंद घेऊन त्याबाबत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

युगंधर ताजणे

दुसरीकडे या घटनेवर बॉलीवूडमधील एकाही सेलिब्रेटीला प्रतिक्रिया द्यावीशी वाटली नाही अशाप्रकारच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. मात्र मराठी चित्रपट सृष्टीतील वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी या घटनेची नोंद घेऊन त्याबाबत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. सध्या प्रसिद्ध मराठी अभिनेता प्रसाद ओकची पोस्ट सोशल मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली आहे. त्या पोस्टमध्ये त्यानं आपण येत्या काळात पीडितांच्या मदतीसाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितलं आहे. त्याच्या या पोस्टची चाहत्यांनी दखल घेतली आहे.

प्रसादनं आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, महापुरामुळे राज्यातील परिस्थिती अतिशय गंभीर आहे. त्यामुळे येत्या आठवडाभर आपण फक्त मदत कार्यासंदर्भातल्याच पोस्ट शेयर करणार आहे. माझा महाराष्ट्र अडचणीत असताना मी माझ्या परीनं मदत करतो आहे. पण त्याबरोबरीनं मी एवढं तरी नक्कीच करायला हवं. मदतीच्या काही पोस्ट असतील तर त्या कृपया मला शेयर करा. मी त्या माझ्या पेजवरुन शेयर करेल. महाराष्ट्र या संकटातून लवकर बाहेर पडावा. अशी त्या परमेश्वराजवळ प्रार्थना. असे प्रसादनं लिहिलं आहे.

यापूर्वी देखील मराठी चित्रपट इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी कोरोनाच्या काळात जनजागृतीचं मोठं काम हाती घेतलं होतं. त्यांनी आपल्या चाहत्यांना लस घेण्यासाठी आवाहन केलं होत. कोरोनाचा प्रचार आणि प्रसार होऊ नये यासाठी काय काळजी घ्यायला हवीय, याबद्दलही त्यांनी सांगितलं होत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB VS KKR LIVE: विराट कोहलीची पहिली धाव अन् सेलिब्रेशन जणू Century सारखं, चाहत्यांना हसू आवरेना... Viral Video ची मजेशीर गोष्ट

Milk Rate Hike: महागाईचा आणखी एक फटका! अमूलनंतर मदर डेअरीनेही दूध दर वाढवले, किती रुपयांनी? बजेट कोलमडणार

Shivprasad Chimpanti : ...अन् त्याच्या जिद्दीसमोर अपंगत्वही हरलं! बोलता-चालताही येईना, गुण मिळवले ६६ टक्के

धक्कादायक! नववीतील विद्यार्थिनीचा शिक्षकाने केला विनयभंग; जामीन मिळाल्यानंतर ‘या’ शाळेने त्याला पुन्हा दिली संधी, अकरावीत शिकणाऱ्या पीडितेला भीती

RCB VS KKR LIVE: विराट कोहलीच्या विक्रमी सामन्यात अंगकृश रघुवंशी चमकला... रिंकू सिंगसह गतविजेत्यांसमोर ठेवले तगडे लक्ष्य

SCROLL FOR NEXT