मनोरंजन

'कोरोना काळात मिळालेली शाब्बासकीची थाप लाख मोलाची'

प्रख्यात मराठी नाट्य - चित्रपट अभिनेता प्रसाद ओक यानं एका कार्यक्रमामध्ये व्यक्त केलेलं मत चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

युगंधर ताजणे

प्रख्यात मराठी नाट्य - चित्रपट अभिनेता प्रसाद ओक यानं एका कार्यक्रमामध्ये व्यक्त केलेलं मत चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यानं म्हटलंय की. कोरोनामुळे गेल्या दीड -दोन वर्षात कोणत्या कार्यक्रमाला प्रत्यक्ष हजेरी लावता आलेली नाही.  सगळ्यांसाठीच ही नवीन सुरूवात आहे. कोरोनाच्या काळात लोक स्वतः वरचा विश्वास गामावत चालले आहेत. त्यांचे मनोबल ढासळत असताना पुरस्काराच्या रूपाने त्यांना मिळालेली शाब्बासकीची थाप ही लाख मोलाची आहे.

'दी एक्स्ट्रा माईल्स अवॉर्ड २०२१'चे वितरण नुकतेच प्रसाद ओकच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मंजिरी ओक, बिग बॉस सीजन १२ मधील बॉलीवूड सेलेब्रिटी सौरभ पटेल, टीव्हीस्टार अनुष्का श्रीवास्तव, 'स्टार फेयर्स इव्हेंट'च्या संस्थापक - संचालिका पल्लवी मोरे - माने,  शो डायरेक्टर अभिजीत मोरे उपस्थित होते. लेमन ट्री प्रीमियर या पंचतारांकित हॉटेलमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडला. यामध्ये देशभरात वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या  ४० मान्यवरांना अवॉर्ड देऊन सन्मानित आले. ट्रॉफी, प्रशास्तीपत्रक आणि भेटवस्तू असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

प्रसाद म्हणाला, कोरोनाच्या काळात अनेकांनी वाईट दिवस पाहिले आहेत. लोक स्वतःवरचा विश्वास गमावून बसले आहेत. अशा परिस्थितीत एक नवीन सुरूवात करताना पुरस्काराच्या रूपाने प्रोत्साहन मिळणे म्हणजे आत्मविश्वास परत मिळवून देण्या सारखे आहे. पल्लवी मोरे - माने  आणि टीमने संपूर्ण देशभरातून खूप वेगळी कार्यक्षमता असणारी माणस शोधून काढली व त्यांना प्रोत्साहन दिले आहे. पल्लवी म्हणाल्या, इतकी वर्ष काम करीत असताना अनेक कर्तुत्ववान लोकं माझ्या संपर्कात आली. मात्र करोंनाच्या काळात ही माणसं आपले वेगळेपण विसरत चाललेली होती. त्यांचा स्वतःवरचा विश्वास कमी होता जात असल्याने त्यांचे काम पुन्हा जागृत करण्यासाठी या पुरस्काराची सुरूवात झाली. त्यासाठी परीक्षकांचे पॅनेल तयार करण्यात आले होते, याच पॅनेलनं ६०० हून लोकांमधून  या ४० पुरस्कारार्थीं ची निवड केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack Video: पत्नीवर पिटबुलचा हल्ला, वाचवायला गेलेल्या पतीलाही चावा; दीड मिनिटात २६ वेळा चावले, हातासह पायावर सर्जरीची वेळ

Dagdusheth Ganpati Temple: ‘दगडूशेठ गणपती ट्रस्ट’ला फरासखाना ठाण्याची जागा मिळणार, पुणे पोलिसांकडून गृह विभागाकडे प्रस्ताव सादर

'वचन दिले तू मला' मालिकेतून अभिनेत्याची एक्झिट; मिलिंद गवळींनी शेअर केली खास पोस्ट ,म्हणाले- खूप त्रास

Shravan Calendar 2026: कॅलेंडर कशाला उघडताय? श्रावणातल्या सगळ्या सणांची यादी इथेच वाचा

Latest Marathi News Live Update : २०१८ च्या भागामध्ये कोणताही महत्त्वपूर्ण बदल झालेला नाही - सरन्यायाधीश

SCROLL FOR NEXT