Prathamesh Parab esakal
मनोरंजन

Prathamesh Parab : दगडूची व्हॅलेंटाईनला पडली विकेट! प्रथमेश परबचा क्षितिजाशी झाला साखरपुडा

व्हॅलेंटाईन डेचा मुहूर्त साधत अभिनेता प्रथमेश परबने साखरपुडा केला आहे. त्याने त्याच्या आयुष्याची जोडीदार निवडली असून क्षितिजा घोसाळकरसोबत त्याचा साखरपुडा झाला आहे. प्रथमेशने याची पोस्ट सोशल मीडियात शेअर केलीय.

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः व्हॅलेंटाईन डेचा मुहूर्त साधत अभिनेता प्रथमेश परबने साखरपुडा केला आहे. त्याने त्याच्या आयुष्याची जोडीदार निवडली असून क्षितिजा घोसाळकरसोबत त्याचा साखरपुडा झाला आहे.

व्हॅलेंटाईन डेच्या शुभमुहूर्तावर प्रथमेशने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली. 'आमचा व्हॅलेंटाईन डे' असं म्हणत प्रथमेशने साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत. चाहत्यांनी या जोडीला भरभरुन शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, प्रथमेशचा नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'ढिशक्यांव' चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आले आणि तेव्हापासून या पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच ताणली गेली आहे. विनोद आणि प्रेम याचे उत्तम समीकरण साधत प्रथमेश परब अभिनित 'ढिशक्यांव' हा चित्रपट सिनेरसिकांच्या भेटीस आला आहे.

प्रथमेश परब याच्यासोबत या चित्रपटात संदीप पाठक, अहेमद देशमुख, सुरेश विश्वकर्मा, मेघा शिंदे या कलाकारांनी भूमिका निभावल्या आहेत.

त्यातच आता प्रथमेशने क्षितिजासोबत साखरपुडा केला आहे. परबांच्या घरी आता लग्नाची धूम सुरु झाली आहे. ऐन व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी हा चाहत्यांसाठी सुखद धक्का आहे.

प्रथमेश आणि क्षितिजाच्या लग्नाची तारीखदेखील जाहीर झाली आहे. पुढच्या दहा दिवसांनी म्हणजे 24 फेब्रुवारीला ते लग्नबंधनात अडकणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT