sangram samel and shraddha 
मनोरंजन

दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला मराठी अभिनेता; जाणून घ्या त्याच्या पत्नीबद्दल

स्वाती वेमूल

'पुढचं पाऊल' या मालिकेत समीरची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेला अभिनेता संग्राम समेळ याने दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. डान्सर श्रद्धा फाटकशी संग्रामचा विवाहसोहळा पार पडला असून त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. संग्रामचं हे दुसरं लग्न असून २०१६ मध्ये त्याने 'रुंजी' फेम पल्लवी पाटीलशी लग्न केलं होतं. मात्र या दोघांचा संसार फार काळ टिकला नाही. त्यानंतर आता संग्राम पुन्हा एकदा आयुष्याची नवी सुरुवात करत आहे. 

इचलकरंजी या ठिकाणी हा विवाहसोहळा संपन्न झाला. संग्रामच्या मित्रमैत्रिणींनी सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर करत या दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिनही क्षेत्रात संग्रामने त्याच्या अभिनयाची छाप सोडली आहे. संग्रामने नाटकातून करिअरची सुरुवात केली. अभिनयाचा वारसा त्याला घरातूनच मिळाला. त्याचे वडील अशोक समेळ हे उत्तम लेखक व अभिनेते आहेत. 

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ललित २०५' या मालिकेतही त्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. संग्रामला 'पुढचं पाऊल' या मालिकेतून खरी ओळख मिळाली. त्यानंतर त्याने 'एकच प्याला' या नाटकातही काम केलं. याशिवाय विकी वेलिंगकर, स्विटी सातारकर, ब्रेव्ह हार्ट या चित्रपटांतही त्याने भूमिका साकारल्या. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जरांगेंनी तिसऱ्यांदा मागितली परवानगी, फक्त ५० जण, वेळ पाळणार आणि शांततेत आंदोलन; मुंबई पोलिसांना दिलं हमीपत्र

Maratha Reservation: मनोज जरांगेंच्या सुरक्षेत वाढ; अंतरवाली सराटी ते मुंबई प्रवासात विशेष सुरक्षा पथक तैनात

Latest Marathi News Update : कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही...: राज ठाकरेंच्या टीकेचा रोष कोणाकडे

Rishi Panchami 2026: ऋषिपंचमीला नांगर न लागलेल्या रानभाज्यांचा नैवेद्य का दाखवला जातो? जाणून घ्या धार्मिक अन् वैज्ञानिक कारण!

Police Officer Death: अचानक प्रकृती बिघडली अन् रक्ताची उलटी झाली; २५ वर्षीय महिला पोलिसाची मृत्यूशी झुंज अपयशी

SCROLL FOR NEXT