marathi actor shreyas talpade heart attack health update by tumbad actor soham shah  SAKAL
मनोरंजन

Shreyas Talpade: "मी त्याला रात्री भेटायला गेलो आणि..." श्रेयसच्या प्रकृतीबद्दल 'तुंबाड' फेम अभिनेत्याने दिले अपडेट

श्रेयसच्या प्रकृतीबद्दल मोठे अपडेट समोर आले आहेत

Devendra Jadhav

Shreyas Talpde Health Update: अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याला दोन दिवसांपुर्वी तातडीने रुग्णालयात दाखल करावं लागलं. वेलकम टू जंगल या सिनेमाच्या सेटवर शुटींग करताना श्रेयसला हृदयविकाराचा झटका आला. अचानक श्रेयसची प्रकृती बिघडल्याने सर्वांना धक्का बसला. आता श्रेयसच्या प्रकृतीबद्दल 'तुंबाड' फेम अभिनेता - निर्माता सोहम शाहने अपडेट दिले आहेत.

श्रेयसच्या प्रकृतीबाबत तुंबाड फेम अभिनेत्याने दिले अपडेट

तुंबाड फेम अभिनेता सोहम शाह श्रेयसला भेटायला हॉस्पीटलमध्ये गेला होता. त्याने ETimes ला सांगितले, "ज्या रात्री त्याला रुग्णालयात नेण्यात आले, त्याच रात्री मी त्याला भेटायला गेलो होतो आणि आजही मी तिथे होतो. श्रेयसला त्याच्या त्याच जुन्या स्टाईलमध्ये हसताना आणि बोलताना पाहून खूप दिलासा मिळाला. मी त्याला भेटायला गेल्याने त्याने माझे आभार मानले."

या दिवशी मिळणार श्रेयसला डिस्चार्ज

श्रेयसला घरी कधी सोडणार याबद्दल सोहमने सांगितलं की, "शहाणपण आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेणाऱ्या श्रेयसच्या पत्नी दीप्ती यांचे आभार. कारण ट्रॅफिकशी झुंज देत हॉस्पिटल गाठणे हे मोठे आव्हान होते. पण दीप्तीने ही जबाबदारी चांगली निभावली. देवाचे आभार मानतो की, तो बरा होत आहे आणि सर्वांच्या शुभेच्छा त्याच्यासोबत आहेत. श्रेयसला रविवारी रात्री 17 डिसेंबर किंवा सोमवारी सकाळी 18 डिसेंबरला डिस्चार्ज दिला जाईल."

श्रेयसला हृदयविकाराचा झटका आल्याने चिंता

४७ वर्षीय श्रेयस हा गेल्या दोन दशकांहून अधिक काळ मनोरंजन विश्वात सक्रिय आहे. तो त्याच्या प्रभावी भूमिकांमुळे नेहमीच चाहत्यांच्या कौतुकाचा विषय राहिला आहे. चित्रपट, मालिकांमधील त्याच्या भूमिकांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. अशात श्रेयसला आलेल्या हदयविकाच्या झटक्याच्या बातमीनं चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. तो बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या 'वेलकम टू द जंगल' नावाच्या चित्रपटाचे शुटींग करत होता. त्यावेळी ही घटना घडली. श्रेयसची तातडीने अँजीओप्लास्टी करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Made in India semiconductor chip: मोदींची मोठी घोषणा! '’वर्षअखेरीस पहिली ‘मेड इन इंडिया’ सेमीकंडक्टर चिप बाजारात येणार'’

Uddhav Thackeray : पाकशी क्रिकेटसाठी परवानगी का? पहलगामच्या वेळी भूतदया कुठे गेली होती

ST Bus: कोकणवासीयांचा प्रवास अधिक सुखद! १९५ एसटी बस पनवेलमध्ये दाखल

Ganeshotsav: गणेशोत्सवनिमित्त हायवेवरील हॉटेल-ढाबा चालकांना पोलीस प्रशासनाच्या सूचना

MP Supriya Sule : ‘मी मटण खाल्लेले पांडुरंगाला चालते’

SCROLL FOR NEXT