siddharth chandekar and mitali mayekar Esakal
मनोरंजन

Siddharth-Mitali: काय सांगतेस तु आई होणार! सिद्धार्थ-मितालीनं दिली गोड बातमी? फोटो व्हायरल

Vaishali Patil

Siddharth Chandekar and Mitali Mayekar: मराठी मनोरंजन विश्वातील गाजलेली आणि तितकीच लोकप्रिय जोडी म्हणजे सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर. दोघांची लव्ह स्टोरी चाहत्यांना प्रेमात टाकते.

सिद्धार्थ अन् मितालीने मालिका आणि चित्रपटांमधुन प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. दोघांच्या चाहत्यांची संख्याही काही कमी नाही.

ही जोडी सोशल मिडियावर खुप सक्रिय असते. दोघेही त्यांचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेयर करत असतात. या जोडीचा मोठा चाहता वर्ग असल्याने त्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल देखील होत असतात. अशातच मितालीनं तिचा एक फोटो सोशल मिडियावर शेयर केला. या फोटोत ती नेहमी प्रमाणे ग्लॅमरस दिसत होती.

मात्र मितालीच्या या फोटोतील कॅप्शने चाहत्यांचे लक्ष वेधले. या फोटोत ती काळ्या रंगाच्या वनपीसमध्ये दिसत आहे. कर्ली केस अन् लाईट मेकअप करत मितालीनं तिचा लूक पुर्ण केला आहे. ती एका बेंचवर बसलेली आहे. हा फोटो शेयर करत तिने लिहिलं की 'मॉमीज गेटिंग हॉट'.

आता तिनं यात मम्मी म्हटल्यानं नेटकऱ्यांच्या नजरा वेधल्या गेल्या. लगेचच ती गरोदर असल्याच्या चर्चा सुरु केल्या. ती आई होणार असल्याचं बोललं जावू लागलं.

सगळ्या पोस्ट शेयर करतांना मिताली त्याला नेहमी हटके कॅप्शन देते मात्र आता या कॅप्शनमुळे तिने चाहत्यांना संभ्रमात टाकलं आहे. नेटकऱ्यांनी तिला तशा कमेंटही करायला सुरुवात केली आहे. तु खरचं आई होणार आहेच का?, मम्मी म्हणजे तुला नेमकं म्हणायचयं का?, तुम्ही आईबाबा होणार आहात का? असे अनेक प्रश्न तिच्या चाहत्यांना पडले आहेत.

आता मिताली आणि सिद्धार्थ खरचं आईबाबा होणार आहेत की मितालीनं फक्त असचं हटके कॅप्शन म्हणुन दिलं , हे तर ते दोघेच सांगू शकतात. मात्र दोघांनीही ही गुडन्यूज लवकरात लवकर सांगावी अशी चाहत्यांची इच्छा आहे.

सिद्धार्थ व मिताली यांची लव्हस्टोरी देखील खुप रोमाँटिक आहे. दोघंही दोन वर्ष लिव्ह- इनमध्ये होते. त्यानंतर दोघांनी त्याच्या नात्याला नावं देण्याचं ठरवलं. 24 जानेवारी 2021 मध्ये पुण्यातील ढेपे वाड्यात दोघंही लग्नबंधनात अडकले. आता या दोघांच्या घरी छोटा पाहूणा येणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News :...तर पुण्यात संध्याकाळी ७ पर्यंतच पेट्रोल पंप सुरु ठेऊ; पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा थेट इशारा, कारण काय?

Kolhapur Politics : संजय पाटील यड्रावकर आणि राजू शेट्टींचे पीए स्वस्तिक पाटील यांच्यात जोरदार खडाजंगी, "तुमचा काय संबंध"; नगपरिषदेतच हाय व्होल्टेज ड्रामा

Latest Marathi Breaking News Live Update : नागपूरमध्ये काँग्रेसच्या गटबाजीला कंटाळून 221 पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा

Nagpur Land Survey : नवीन नागपूरसाठी जमिनीच्या संयुक्त मोजणीला सुरुवात; शेतकऱ्यांचे सहकार्य; विविध यंत्रणांचा सहभाग!

Pune Traffic : पुणेकरांना वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा; चारही महामार्ग जोडणारा ४५ किमीचा 'ट्विन टनेल' भूमिगत रस्ता प्रस्तावित

SCROLL FOR NEXT