swapnil joshi 
मनोरंजन

स्वप्नील जोशीचा नवीन वर्षात ‘अश्वत्थ’: टीझर व्हायरल

मराठी अभिनेता स्वप्नील जोशीनं (Marathi Actor Swapnil Joshi) समांतर (Samantar Web Serise) या त्याच्या वेबसीरिजमधून चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

सकाळ डिजिटल टीम

Swapnil Joshi : मराठी अभिनेता स्वप्नील जोशीनं (Marathi Actor Swapnil Joshi) समांतर (Samantar Web Serise) या त्याच्या वेबसीरिजमधून चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्याच्या या मालिकेला मोठ्या प्रमाणात प्रतिसादही मिळाला होता. आता त्यानं नव्या वर्षाच्या सुरुवातीला आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. त्या चित्रपटाचे नाव ‘अश्वत्थ’ असून त्याचे दिग्दर्शन लोकेश गुप्ते (Lokesh Gupte) हे करणार आहेत. ‘अश्वत्थ’ २०२२ च्या हिवाळ्यात प्रदर्शित होणार असून स्वप्नीलनं या चित्रपटाचा टीझर आणि पोस्टर सोशल मीडीयावर व्हायरल केला आहे. ‘अश्वत्थ’चा टीझर भगवत गीतेतील एका लोकप्रिय अशा श्लोकाच्या पार्श्वभूमीवर बेतलेला आहे.

संकृतमधील या श्लोकाचा ढोबळ अर्थ असा की...जेव्हा मनुष्य योगारूढ होतो तेव्हा तो आपला उद्धार स्वतःच करतो आणि स्वतःच आत्मबलाच्या सामर्थ्यावर ऊंची गाठतो. त्यानं आपल्या आत्म्याचे अधःपतन होवू देता कामा नये. मनुष्य स्वतःच स्वतःचा बंधू असतो आणि स्वतःच स्वतःचा शत्रू असतो. चौखूर उधळलेल्या घोड्याच्या पृष्ठभूमीवर सादर होणाऱ्या या श्लोकानंतर टीझरमध्ये मराठी शब्द उधृत होतात. ते आहेत, “मन, बुद्धी, चित्त आणि अहंकारावर मात करून स्वाभिमानाने जगतो तो अश्वत्थ.” या टीझरच्या माध्यमातून चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक या चित्रपटाच्या एकूण कथेबद्दल एक कल्पना अधोरेखित करतात. त्यातून मग या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी ताणली जाते.

स्वप्निल जोशीची (Swapnil Joshi) मुख्य भूमिका असलेल्या ‘अश्वत्थ’च्या पोस्टरची सोशल मिडीयासकट (social media) सगळीकडे जोरदार चर्चा आहे. अनेक सुपरहीट चित्रपटांनंतर स्वप्निलला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. इतर कलाकार आणि तंत्रज्ञ याबद्दलची माहिती अजून गुलदस्त्यात असली तरीस्वप्नील जोशी आणि लोकेश गुप्ते हे नवं समीकरण, नव्या वर्षात, ‘अश्वत्थ’च्या निमित्ताने प्रेक्षकांसमोर काहीतरी नवं आणणार, याबद्दल सर्वांनाच खात्री आहे. या टीझरचा व्हीडीओ पोस्ट करून स्वप्नील जोशीने आपल्या चाहत्यांबरोबर ही गोड बातमी शेअर केली आहे. तो म्हणतो, “नवीन वर्ष, नवीन संकल्प! नांदी...नव्या वर्षाची, नव्या संकल्पाची! नांदी…अश्वत्थची !!!” या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रख्यात दिग्दर्शक लोकेश गुप्ते यांनी केले आहे.

एबी आणि सीडी, एक सांगायचंय,ऋुणानुबंध, डेटभेट आणि मुंगळा यांसारख्या दर्जेदार चित्रपटांनी आपले वेगळे स्थान लोकेशने याआधीच चित्रपटसृष्टीत निर्माण केले आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून एक नवा मैलाचा दगड उभा करण्यास तो सज्ज झाला आहे. टीझरमध्ये मकरंद देशपांडेचा आवाज ऐकू येतो. त्यामुळे यात मकरंदसुद्धा आहे का, याबद्दलहि प्रेक्षकांमध्ये उत्सुकता ताणली गेली आहे. चित्रपट २०२२च्या हिवाळ्यात प्रदर्शित होणार आहे. अलीकडेच आलेल्या ‘समांतर’ या वेबसिरीजमध्ये स्वप्नीलची प्रमुख भूमिका होती आणि तिचे दोन्ही सीझन गाजले होते. या पार्श्वभूमीवर स्वप्नीलच्या या नवीन चित्रपटाबद्दल रसिकांच्या मनात उत्सुकता लागून राहिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation : काळजी घ्या, सगळं ठरल्याप्रमाणं होईल! जरांगेंना भेटताच विखे पाटलांनी दिली सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती

Marathwada Rain Forecast : मराठवाड्यात आजपासून वादळासह पावसाची शक्यता, तापमानात एक ते दोन अंशाने वाढ

Numerology: 'या' मूलांकाच्या मुली सासरी घेऊन येतात अखंड समृद्धी! पाहा कोणत्या मूलांकाची मुलगी सासरसाठी ठरते लक्ष्मी?

Marathi News Live Updates : मरीन ड्राइव्हकडून हाजी अलीच्या दिशेने जाताना BMW कोस्टल रोडवरून कोसळली; तिघांचा मृत्यू, पोलिस काय म्हणाले?

Raju Shetti Sugarcane FRP : 'स्वाभिमानी'ची नेहमीची भूमिका बदलली! राजू शेट्टी पहिल्यांदाच समतोल भूमिका घेत कारखानदारांच्या भेटीला; नेमक्या मागण्या काय?

SCROLL FOR NEXT