umesh kamat
umesh kamat 
मनोरंजन

'फक्त नाटकाच्या थिएटर्समध्येच कोरोना आहे का?'; उमेश कामतचा सवाल

स्वाती वेमूल

आजूबाजूला पाहिल्यास सर्व गोष्टी सुरू झाल्या आहेत, फक्त नाटक इंडस्ट्री थांबली आहे. फक्त नाटकाच्या थिएटर्समध्येच कोरोना आहे का, असा सवाल अभिनेता उमेश कामतने उपस्थित केला आहे. इतर व्यवसायांसाठी जसं वेळेचं बंधन आणि नियम-अटींचं पालन करत परवानगी देण्यात आली आहे. तसंच नाटकांच्या बाबतीत विचार करावा, असं त्याने म्हटलंय. 'ई सकाळ'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्याने नाटकांसाठी थिएटर्स उघडावेत का, यावर मत व्यक्त केलं. (marathi actor umesh kamat on theatres industry and lockdown slv92)

काय म्हणाला उमेश?

"आजूबाजूला सगळ्या गोष्टी सुरू झाल्या आहेत. वेळेचं बंधन नक्कीच आहे. पण अशी कुठली इंडस्ट्री थांबली आहे, तर फक्त नाटकांची. बाकी सगळं सुरू आहे. फक्त नाटकाच्या थिएटरमध्येच कोरोना आहे का? मोठमोठ्या सभा होत आहेत, निवडणुकांच्या वेळी सूट दिली जाते. फक्त नाटकाचं थिएटर बंद आहे, त्याचं वाईट वाटतं. जेव्हा थिएटरमध्ये ५० टक्के प्रेक्षकांची अट होती, तेव्हासुद्धा दादा एक गुड न्यूज आहे, या नाटकाला उदंड प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे काहीतरी नियम, अटी आखून सरकारने थिएटर उघडण्याची परवानगी द्यावी. कोरोनाची फिकर करायची नाही, असं माझं म्हणणं नाही. पण जसं बाकीच्यांना नियम-अटी लागू आहेत, तसंच नाटकांसाठी करावं. कारण हे किती काळ बंद राहील याला सुमारच दिसत नाहीये. एक मोठी इंडस्ट्री यामुळे थांबण्याची भीती वाटतेय. त्यावर अनेकांचं जगणं अवलूंबन आहे. ज्यांचं जगणं फक्त नाटकावर अवलंबून आहेत, त्यांचे अक्षरश: हाल होतायत," असं उमेश म्हणाला.

यावेळी उमेशने '..आणि काय हवं?' याच्या तिसऱ्या सिझनविषयीही माहिती दिली. तिसऱ्या सिझनचं शूटिंग सुरू असतानाच प्रिया बापट आणि उमेश कामतला कोविडची लागण झाली होती. त्यावर मात करत शूटिंग कसं पूर्ण केलं, याविषयीही उमेशने सांगितलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT