prashant damle. prashant damle news, prashant damle birthday, prashant damle family SAKAL
मनोरंजन

Prashant Damle: अभिनेते प्रशांत दामले यांनी वाढदिवसानिमित्त केली मोठी घोषणा, यापुढे नाटकाला...

वाढदिवसानिमित्त प्रशांत दामले यांनी महत्वाची घोषणा केलीय.

Devendra Jadhav

Prashant Damle News: आज दिग्गज अभिनेते प्रशांत दामले यांचा वाढदिवस. प्रशांत दामले आज त्यांचा ६२ वा वाढदिवस आज साजरा होतोय. प्रशांत दामले यांनी आजवर अनेक सिनेमे आणि मालिकांमधून अभिनय केला.

पण प्रशांत दामले यांची प्रमुख ओळख राहिली आहे ती एक नाटककार. प्रशांत दामले यांनी आजवर अनेक नाटकांमधून बहुरूपी भूमिका साकारल्या आहेत.

आजही प्रशांत दामले रंगभूमीवर कार्यरत आहेत. वाढदिवसानिमित्त प्रशांत दामले यांनी महत्वाची घोषणा केलीय.

(marathi actors prashant damle big announcement on his birthday about marathi natak)

प्रशांत दामले यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेयर केलाय. या व्हिडिओत प्रशांत दामले म्हणतात.. मी एक महत्वाची घोषणा करत आहे. आमचं नाटक आहे नियम व अटी लागू ते आजपासून त्याचे जिथे कुठे प्रयोग असतील तिथे पुढच्या पाच सीट्स कॉलेज तरुणांसाठी फ्री मध्ये राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

कॉलेज तरुणांनी त्यांचं ओरिजिनल ID आणि प्रिंट आऊट प्रयोगाच्या १ तास आधी तिकीट खिडकीवर जमा करायचे. त्यांचा संपर्क क्रमांक द्यायचा. म्हणजे माझ्याकडे नोंद राहील..

अशाप्रकारे तरुण पिढीने नाटकांकडे आकर्षित व्हावे, म्हणून प्रशांत दामलेंनी हा महत्वाचा निर्णय घेतला आहे.

अशाप्रकारे नियम व अटी लागू नाटकाचे प्रयोग महाराष्ट्रात ज्या ठिकाणी असतील तिथे फक्त पाच कॉलेजवयीन तरुणांना प्रयोगाआधी १ तास येऊन त्यांचं ID दाखवून नाटक फ्री मध्ये पाहण्याचा आनंद घेऊ शकतील. प्रशांत दामलेंच्या या निर्णयाचं सगळीकडे कौतुक होतंय.

यंदा नाट्य परिषदेची निवडणूक रंगणार आहे. या निवडणुकीत प्रसाद कांबळींच्या आपलं पॅनलला आव्हान द्यायला अभिनेते आणि निर्माते प्रशांत दामले निवडणुकीत उतरले आहेत.

काही दिवसांपूर्वीच त्यांची त्यांच्या 'रंगकर्मी नाटक समूह’ या पॅनलची कार्य आणि उद्दिष्टे जाहीर केली.

त्यांच्या पॅनल मध्ये विजय केंकरे, अजित भुरे , सयाजी शिंदे, विजय गोखले, वैजयंती आपटे, दिलीप जाधव, सुशांत शेलार, सविता मालपेकर, विजय सूर्यवंशी या नावांचा समावेश आहे. जय सूर्यवंशी या नावांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indore Fire Accident : इमारतीला भीषण आग, ७ जणांचा होरपळून मृत्यू; इलेक्ट्रिक कार चार्जिंग करताना शॉर्टसर्किटमुळे दुर्घटना

Dhangar Community: मेंढपाळ धनगरांसाठी अर्धबंदिस्त मेंढीपालन प्रकल्पाचे संकेत; कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक!

Hasan Mushrif Kolhapur Politics : जिल्हा बँक, गोकुळ, झेडपी, बाजार समिती आणि मंत्रीपद, मुश्रीफांचे ‘सब कुछ कागल’ मग जिल्ह्याला काय

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये बलात्कार प्रकरणातील आरोपी अशोक खरात उर्फ स्वघोषित कॅप्टन अटकेत

Beed Illegal Mining: अवैध खदानीत मृत्यू; पीक विमा उचलून प्रशासनास डल्ला?;ज्ञानेश्वर सावंतच्या खदानीत घोटाळा

SCROLL FOR NEXT