marathi actress ashvini mahangade share her new year resolution of 2024  SAKAL
मनोरंजन

Ashvini Mahangade: "गड- किल्ले यांच्या चरणी...", अभिनेत्रीने नवीन वर्षासाठी केलाय भन्नाट संकल्प

अश्विनीचा नवीन वर्षाचा संकल्प ऐकून अनेकांनी तिचं कौतुक केलंय

Devendra Jadhav

Ashvini Mahangade New Year Resolutions: आज नवीन वर्ष म्हणजेच २०२४ ला उत्साहात सुरुवात झालीय. २०२४ चं स्वागत अनेकांनी धूमधडाक्यात केलं असेल यात शंका नाही. २०२३ ला आनंदात निरोप देऊन २०२४ मध्ये पाऊल ठेऊन काहीतरी नवं करण्यासाठी सर्व सज्ज असतीलच. अनेकांनी २०२४ साठी खास संकल्प केले असतीलच.

अशातच 'आई कुठे काय करते' फेम अनघा म्हणजेच अभिनेत्री अश्विनी महांगडेने नवीन वर्षाचा खास संकल्प केलाय. काय आहे अश्विनीचा संकल्प? वाचाच.

अश्विनीचा नवीन वर्षासाठी खास संकल्प

अश्विनीने तिच्या बॉयफ्रेंड आणि कुटुंबासोबतचा एक फोटो शेअर केलाय. या फोटोत अश्विनी कोल्हापूरच्या ज्योतिबा मंदिरात दर्शनाला गेली आहे. हे फोटो शेअर करत अश्विनीने नवीन वर्षाचा संकल्प सांगितलाय.

अश्विनी लिहीते, "इंग्रजी नवीन वर्षात काय नवीन संकल्प करावा बरं?
असे मनात आले आणि आम्ही संकल्प केला की महाराष्ट्रातील सर्व देवस्थानं, मंदिर, गड- किल्ले यांच्या चरणी नतमस्तक व्हायचे.
सुरुवात केली ....... १. जोतिबा मंदिर, कोल्हापूर"

अश्विनीचा हा अनोखा संकल्प ऐकून अनेकांनी तिचं कौतुक केलंय.

अश्विनीचा बॉयफ्रेंड काय करतो?

काही महिन्यांपुर्वी अश्विनीने तिच्या आणि तिच्या बॉयफ्रेंडच्या नात्याचा खुलासा केलाय. अश्विनीच्या बॉयफ्रेंडचं नाव निलेश जगदाळे.

निलेश हा व्यावसायिक आहे. The Farmotsav या दूध उत्पादक संबंधी कंपनीचा आणि FLYING ANGEL या ब्युटी प्रॉडक्ट कंपनीचा तो फाऊंडर आहे. याशिवाय मोरया प्रॉडक्शनच्या माध्यमातुन तो अनेक गाणी आणि सिनेमांची निर्मिती करतो.

अश्विनीचं वर्कफ्रंट

अश्विनीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर... अश्विनी सध्या 'आई कुठे काय करते' मालिकेत अनघाची भूमिका साकारतेय. याशिवाय ती लवकरच 'पुण्यश्लोक अहिल्याबाई' सिनेमात अभिनय करताना दिसणार आहे.

पुण्यश्लोक अहिल्याबाई सिनेमाचं सध्या शुटींग सुरु असून अश्विनी या सिनेमात अहिल्याबाई होळकर यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा सिनेमा यावर्षी २०२४ ला रिलीज होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शांतता कराराची घोषणा पण ट्रम्पसमोर इराणच्या ३ मोठ्या अटी, अमेरिका-इराण डीलमध्ये १४ मुद्दे महत्त्वाचे

Fifa World Cup 2026: ब्राझीलला बरोबरीचेच समाधान; मोरोक्कोसमोर पाच वेळच्या विजेत्यांचा कस, व्हिनिसियसच्या गोलने दिलासा

Pune Solapur Highway Traffic : पुणे-सोलापूर महामार्गावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी, वाहनांच्या ६ किलोमीटरपर्यंत रांगा; प्रवाशांचे प्रचंड हाल

Latest Marathi News Live Update : उन्हाळी सुटीनंतर राज्यातील ज्ञानमंदिरे आजपासून पुन्हा गजबजणार; चिमुकल्यांना पहिल्या दिवसाची उत्सुकता

Kasba Beed Gold Coins : शिलाहार राजवंशाची उपराजधानी असलेल्या कोल्हापूरच्या 'या' गावात पुन्हा सापडल्या सुवर्णमुद्रा! काय आहे अतिप्राचीन 'बेडा' आणि त्रिशूळाचे रहस्य?

SCROLL FOR NEXT