bhargavi chirmule uncle 
मनोरंजन

अभिनेत्री भार्गवी चिरमुलेचे काका रस्त्यावर कॅलेंडर विकून करतायेत उदरनिर्वाह

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- कोरोनाच्या संसर्गामुळे सगळ्यांवरचाच आर्थिक ताण वाढत चालला आहे. लॉकडाऊनमध्ये अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती. मात्र अनलॉकमध्ये काही गोष्टी सुरु केल्या असल्या तरी अनेकांचे उद्योग, व्यवसाय अजुनही आर्थिक कारणांमुळे ठप्प झाले आहेत. त्यामुळे अनेकांना या आर्थिक तणावाचा सामना करावा लागतोय. काहीजणांनी उदरनिर्वाह करण्यासाठी लहान-मोठे व्यवसाय सुरु केले आहेत. असंच काहीसं घडलंय अभिनेत्री भार्गवी चिरमुले हिच्या काकांच्या बाबतीत. याविषयी माहिती देत भार्गवीने एक पोस्ट शेअर केली आहे.   

अभिनेत्री भार्गवी चिरमुले सोशल मिडियावर एक पोस्ट करत तिच्या चुलत काका आणि आत्या यांच्यावर ओढवलेल्या आर्थिक संकटात त्यांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे. भार्गवीचे काका सध्या पुण्यात रस्त्यावर कॅलेंडर, उदबत्या आणि इतर लहान-सहान वस्तू विकत आहेत. त्यांची परिस्थिती सध्या हालाखीची आहे. भार्गवीने पोस्ट करत त्यांच्या या आर्थिक समस्येची सविस्तर माहिती दिली आहे.

तिने म्हटलंय, “माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध आमुचे सुरु. हे आहेत श्री. चिरमुले आजोबा. कोरोनाने अनेकांचे कंबरडे मोडले त्यात यांचे देखील पण अनेकांनी शिकावी अशी यांची वयाच्या ८१ तही असलेली जगण्याची जिद्द आणि लढाऊ वृत्ती….हे आजोबा आपल्या 65 वर्षीय मूक-बधिर बहिणीसोबत सदाशिव पेठेतील एका वाड्यात रहातात. उदरनिर्वाहासाठी दोघेही बँकांमधून शेव, फरसाण वगैरे पदार्थ विकतात आणि रोज संध्याकाळी सदाशिव पेठेत एका स्टूलावर सर्व पदार्थ मांडून विकण्याचा प्रयत्न करतात. पण कोरोना आला आणि सोबत यांच्या आयुष्यात घेऊन आला मोठ्ठे प्रश्नचिन्ह ??? बँका चालू होत्या, चालू आहेत. आजोबांची बँकेत जाऊन पदार्थ विकण्याची तयारीही आहे, पण बँकेतले कर्मचारी आजोबांना आता येऊ देत नाहीत, अर्थात स्वतःच्या आणि आजोबांच्या काळजीपोटी पण आता करायचे काय ? चिरमुले आज्जी- आजोबा या पदार्थांसोबत कधी उदबत्ती, कधी वाती ,कधी पंचांग विकायला आणतात. आता आजोबांनी कॅलेंडर विकायला ठेवली आहेत. आपल्या सर्वांना एक आवाहन आहे. कॅलेंडर तर आपण कोठून तरी घेणारच मग आपल्या नवीन वर्षाची सुरुवातच एका चांगल्या कामाने झाली तर ? आपण घ्या आणि आपल्या मित्रमंडळींना पण सांगा आपल्यासाठी असलेलं ‘कॅलेंडर’ कोणाच्यातरी जगण्याचा आधार बनू शकेल” अशी पोस्ट भार्गवीने शेअर केलीये.

या पोस्टच्या शेवटी तिने लिहिलंय, “हे माझे चुलत काका आणि आत्या आहेत. आम्ही सगळे कुटुंबीय कायम त्यांना मदत करतच असतो. पण, शेवटी आत्मनिर्भर स्वभाव आहे त्यांचा. त्यामुळे माझ्या पुण्यातल्या मित्र-मैत्रिणींना विनंती करते, तुमच्या परिने जी मदत होऊ शकेल, कॅलेंडर किंवा इतर वस्तू घेण्याच्या निमित्ताने तेवढी करा. मनापासून आभार” असं म्हणत भार्गवीने त्यांच्याकडील वस्तु खरेदी करुन त्यांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे.

marathi actress bhargavi chirmule shared emotionalpost for her uncle asking for help  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT