This Marathi ancestress  joins Mimi team
This Marathi ancestress joins Mimi team 
मनोरंजन

क्रितीच्या 'मिमी' मध्ये दिसणार ही मराठमोळी अभिनेत्री, पाहा फोटो

वृत्तसंस्था

मुंबई : 'लुकाछुपी' आणि 'हाउसफुल 4' च्या घवघवीत यशानंतर क्रिती सॅननचा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'मिमी' असं या चित्रपटाचं नाव असून त्याचा पहिला पोस्टर काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात आला. विशेष म्हणजे या सिनेमामध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील एक बोल्ड अभिनेत्रीदेखील झळकणार आहे. जाणून घ्या कोण आहे ती मराठमोळी अभिनेत्री ! 

मराठीत आपल्या अभिनयाची छाप पाडल्यावर अभिनेत्री सई ताम्हणकर हिंदी इंडस्ट्रीमध्ये आपला ठसा उमटवत आहे. याआधी ती 'हंटर', 'लव्ह सोनिया' या हिंदी चित्रपटांमधून झळकली आहे. या चित्रपटांनंतर बॉलिवूडमध्ये तीनं आपली वेगळी ओळख निर्माण केली लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'मिमी' या हिंदी चित्रपटात ती झळकणार आहे. या चित्रपटात ती कोणती भूमिका साकारणार आहे हे अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी अभिनेत्री क्रिती सॅननसोबत स्क्रिन शेअर करताना ती दिसणार आहे. शुटिंगदरम्यानचा क्रितीसोबतचा फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. क्रितीनेही हा फोटो तिच्या अकाउंटवर रिपोस्ट केला आहे. फोटोमध्ये क्रिती आणि सई ब्लॅंकेटमध्ये चेहरा लपवताना दिसत आहेत. 

मोठ्या बॅनरखाली तयार होणाऱा हा चित्रपट सईसाठी नक्कीच खास ठरणार आहे. या सिनेमामध्ये क्रिती एका सरोगसी आईच्या भूमिकेत दिसणार आहे. सई या चित्रपटातून काय जादू करणार याची उत्सुकता चाहत्यांमध्ये दिसून येत आहे. 

या चित्रपटामध्ये क्रिती मुख्य भूमिका साकारणार आहे. एका अनोख्या विषयावर असणाऱ्या या सिनेमाचं पोस्टर पाहिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. मात्र, हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याविषयीची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.

याचं आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे  'मिमी'  हा सिनेमा ‘मला आई व्हायचंय’ या मराठी सिनेमावर आधारित आहे. जो एका विदेशी आणि गरीब भारतीय महिलेच्या कथेवर आधारित आहे. या मराठी सिनेमाला 2011 चा सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. मिमी या सिनेमाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं असून निर्मिती दिनेश विजान यांची आहे. क्रिती सॅननसोबत या चित्रपटामध्ये अभिनेता पंकज त्रिपाठी दिसणार आहे. याआधी 'लुकाछुपी' मध्ये क्रिती आणि पंकज त्रिपाठी एकत्र दिसले होते.
क्रिती लवकरच 'पानिपत' या चित्रपटामधूनही झळकणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT