Actress Hemangi Kavi esakal
मनोरंजन

Viral Post: हेमांगी कवी म्हणते, 'औकात में रेह!' पोस्टची तळटीप चर्चेत

राज्यातील राजकारणाचा तयार झालेला तिढा अजुन काही सुटलेला नाही. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांची बंडखोरी (eknath shinde) महाविकास आघाडी सरकारला धोकादायक ठरताना दिसत आहे.

युगंधर ताजणे

Maharashtra Political Crisis: राज्यातील राजकारणाचा तयार झालेला तिढा अजुन काही सुटलेला नाही. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांची बंडखोरी (eknath shinde) महाविकास आघाडी सरकारला धोकादायक ठरताना दिसत आहे. गेल्या आठवड्यापासून जो राजकीय संघर्ष सुरु आहे त्याची दखल वेगवेगळ्या (Marathi Entertainment News) माध्यमातून घेतली गेली आहे. त्यावर राजकीय नेत्यांबरोबरच सेलिब्रेटींनी देखील आपआपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यापूर्वी (Marathi actors) मराठी मनोरंजन क्षेत्रातील कलाकार, आरोह वेलणकर, किरण माने, तेजस्विनी पंडित, सुमीत राघवन यांच्या पोस्ट चर्चेत आल्या होत्या. या कलाकारांनी प्रत्यक्ष - अप्रत्यक्षपणे सद्यस्थितीवर टिप्पणी करुन नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. (Hemangi Kavi social media news)

यासगळ्यात मराठी - हिंदी चित्रपटांतील प्रसिद्ध अभिनेत्री हेमांगी कवीच्या (actress hemangi kavi news) वेगवेगळ्या पोस्टनं नेटकऱ्यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले आहे. भलेही हेमांगीनं थेटपणे कोणत्याही पक्षावर, नेत्यावर प्रतिक्रिया दिली नसली तरी तिच्या काही पोस्टमधून सुचक अर्थ नेटकरी काढताना दिसत आहे. त्यामुळे त्या पोस्टची चर्चाही होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी तिनं तिच्या आगामी एका चित्रपटातील एका गाण्याची पोस्ट शेयर केली होती. त्यावरुन मोठा वाद सोशल मीडियावर झाला होता. आताही हेमांनी तिच्या फेसबूक वॉलवरुन एक पोस्टर शेयर केलं आहे. त्यामध्ये तिचाही हटके लूक दिसतो आहे. त्यात त्या पोस्टमध्ये औकात में रह असं पोस्टरमध्ये म्हटलं असून वेगवेगळ्या कलाकारांचे फोटो त्यात आहेत.

hemangi kavi news

हेमांगीनं ती पोस्ट शेयर करताना त्याला एक तळटीप दिली आहे. ती मात्र बोलकी आहे. ती म्हणते, ही post कुणी personally घेतली तर बरंच होईल! यावरुन नेटकऱ्यांनी हेमांगीला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले आहेत. तुमच्यावर टीका करणाऱ्यांसाठी ही पोस्ट आहे का असा प्रश्न एकानं विचारला आहे. तर दुसऱ्यानं टीका करणाऱ्यांना सडतोड उत्तर असं म्हटलं आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता मनोरंजन सेलिब्रेटींनी शेयर केलेल्या पोस्टलाही राजकीय रंग देण्याचा प्रकार सुरु असल्याचे दिसून येत आहे.

hemangi kavi post

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT