hemangi kavi instagram
मनोरंजन

'तू एवढी गचाळ का राहतेस'; महिलेच्या कमेंटवर भडकली हेमांगी कवी

ट्रोल करणाऱ्या महिलेला तिच्याच भाषेत हेमांगीचं उत्तर

स्वाती वेमूल

अभिनयक्षेत्रातील कलाकारांना सोशल मीडियावरील विनाकारण ट्रोलिंगचा अनेकदा सामना करावा लागतो. कधी फोटोवर तर कधी मांडलेल्या मतावर, नेटकऱ्यांकडून टिकाटिप्पणी ऐकावीच लागते. या ट्रोलिंगला वैतागून काही कलाकारांनी थेट सोशल मीडियालाच रामराम केला. तर काही कलाकार ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देऊन त्यांचं तोंड बंद करतात. असाच काहीसा किस्सा मराठीसोबतच हिंदीतही आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या अभिनेत्री हेमांगी कवीसोबत घडला आहे. हेमांगीच्या राहणीमानावरून एका नेटकऱ्याने कमेंट केली असता हेमांगीने संबंधित ट्रोलरला त्याच्याच भाषेत उत्तर दिलं आहे.

हेमांगी इन्स्टाग्रामवर तिच्या डान्सचे आणि अभिनयाचे काही व्हिडीओ पोस्ट करत असते. अशाच एका पोस्टवर नेटकऱ्याने कमेंट केली, 'एक्स्प्रेशन आणि डान्स वगैरे ठीक आहे पण एवढी गचाळ का राहतेस? जरा टापटिप राहा म्हणजे आम्हाला बघवेल व्हिडीओ, प्लीज.' या कमेंटवर संबंधित ट्रोलरला हेमांगीने तिखट शब्दांत रिप्लाय दिला. 'ते शून्य कर्तृत्व आणि दुसऱ्यांच्या पैशांवर खाणं ठिक आहे पण एवढी जाडी का आहेस? जरा कमी कर वजन म्हणजे आमच्या इन्स्टाला तुझा भार सोसवेल. प्लीज.'

हेही वाचा : 'बापाला मुलाची शेंडी ओढण्याचा पूर्ण अधिकार'; नेटकऱ्यावर चिडला गश्मीर

सध्या हेमांगी 'तेरी लाडली मै' या हिंदी मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. 'मुलगी झाली हो' या मराठी मालिकेचा हा हिंदी रिमेक आहे. हेमांगीने मराठी चित्रपट आणि नाटकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

फरसावाले बाबा कोण? मृत्यूमुळे शिष्य आणि भाविक आक्रमक, महामार्ग रोखला

World Record: १५ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय T20त शतक! नाबाद १११ धावांनी रचला इतिहास; अनेक विक्रम मोडले, फलंदाजने मैदान गाजवले

Ashok Kharat Case : कालाय तस्मै नम:! चाकणकरांनी पीडितांना न्याय न दिल्यानं परतफेडीची वेळ, खरातला राजकीय पाठबळ; रोहिणी खडसेंचा घणाघात

April Travel Destination: एप्रिलमध्ये ट्रिप प्लॅन करताय? या’ 5 ठिकाणांना भेट देणं ठरेल बेस्ट

बॅट दे रे...! T20 World Cup मध्ये तीन भोपळ्यांनंतर अभिषेक शर्माचा मेसेज येताच काय दिलं शुभमन गिलने उत्तर; पाहा Video

SCROLL FOR NEXT