मनोरंजन

किचनमध्ये असतो तसा चोमडेपणा सुरुयं, क्रांतीचा सणसणीत आरोप

बॉलीवूडमधील किंग खानचा मुलगा आर्यनच्या प्रकरणावर आज सुनावणी होणार आहे.

युगंधर ताजणे

मुंबई - आर्यन खानच्या प्रकरणावर आज सुनावणी होणार आहे. मात्र त्यापूर्वी या प्रकऱणामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे बदल झाले आहेत. त्यामुळे मोठी धक्कादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. आर्यन खानच्या प्रकरणात एनसीबीचे मुख्य तपास अधिकारी समीर वानखेडे यांच्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानं या प्रकरणानं वेगळे वळण घेतले आहे. दुसरीकडे आर्यन खानला दिलासा मिळणार की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. आर्यन खान प्रकरणात राजकीय सहभाग मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतो आहे. त्यात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी केलेले आरोप लक्ष वेधून घेत आहेत.

यासगळ्या प्रकरणावर आज समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकरनं पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये तिनं आपल्या पतीवरील आरोप खोटे असल्याचे सांगितले. एका राजकीय द्वेषापोटी हे आरोप करण्यात आल्याचे तिनं सांगितलं आहे. वानखेडे यांच्यावर झालेल्या आरोपांना उत्तर देताना क्रांतीनं सांगितलं की, समीर गेल्यावर त्या खुर्चीवर कोण बसणार आणि कुणाचा फायदा होणार हे पाहणे महत्वाचे आहे. आम्हाला आमच्या फॅमिलिला धमकावण्याचे प्रकार सुरु आहे. आम्ही काहीही सुरु केलेलं नाही. माध्यमांनी आम्हाला आतापर्यत खूप सहकार्य केलं आहे. त्याबद्दल मला त्यांना धन्यवाद द्यायचे आहे. मलिकांना बर्थ सर्टिफिकेट दाखवले आहे. आणखी काय करणं बाकी आहे मला सांगा असा सवाल क्रांतीनं यावेळी केला आहे.

हे जे काही चाललं आहे ते एखाद्या किचनमध्ये चालणाऱ्या गॉसिपिंग सारखं आहे. हा एक प्रकारचा निव्वळ चोमडेपणा आहे. आपल्याकडे व्टिटरचे अकाऊंट आहे म्हणून काहीही बोलायचे, आरोप करायचे असा प्रकार सुरु आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत कोण खरं आणि खोटं हे समोर आल्याशिवाय राहणार नाही. असा इशाराही क्रांतीनं यावेळी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Crackers Ban : सर्वोच्च न्यायालयाचा फटाक्यांबाबत मोठा निर्णय; देशभरात बंदी घालता येणार नाही पण...

IND vs WI 2nd ODI : वादाला निमित्त! OUT or NOT OUT? नमन धीरचा अफलातून झेल, पण विंडीजला तो नाही पटला... Video पाहून ठरवा

Maratha Reservation: अंतरवालीमधील कोणी टीका केली तर दुर्लक्ष करा ; जरांगे . गावाचे योगदान विसरणार नाही

Latest Marathi News Live Update : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी सिरीवेल्ली प्रसाद पाच दिवस मुंबई दौऱ्यावर; बैठकांना सुरुवात

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

SCROLL FOR NEXT