Marathi Actress Manasi Naik Divorce,New post viral Google
मनोरंजन

Manasi Naik: ''देव आज मला म्हणाला...'', घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान मानसीच्या भावूक पोस्टनं वेधलं लक्ष

गेल्या अनेक दिवसापासून मानसी नाईक तिच्या घटस्फोटामुळे चर्चेत आहे. पण तिनं नुकत्याच केलेल्या पोस्टनं तिच्या मनात दडलेल्या वादळाला समोर आणलं आहे.

प्रणाली मोरे

Manasi Naik: गेल्या अनेक दिवसांपासून मराठी अभिनेत्री मानसी नाईकचं नाव चर्चेत आहे,ते तिच्या घटस्फोटामुळे. एरव्ही नवऱ्यासोबत वेगवेगळ्या रील्स सोशल मीडियावर अपलोड करत आकंठ प्रेमात बुडालेल्या मानसीच्या आयुष्यात असं घडलंच कसं हा प्रश्न तिच्या चाहत्यांनाच नाही तर अनेकांना पडला. सुरुवातीला अफवा असेल असं वाटत असताना स्वतः मानसीनं आपण आपला पती बॉक्सर आणि मॉडेल प्रदीप खरेराला घटस्फोट देत आहोत या बातमीवर शिक्कामोर्तब केलं.(Marathi Actress Mansi Naik Divorce,New post viral)

सध्या आपली मनःस्थिती फारशी चांगली नसली तरी आपण या परिस्थितीचा स्विकार केलाय असं मानसी सांगतेय. इतकंच नाही तर मोडणाऱ्या संसाराचा घाव सहन करत त्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न आपण करत आहोत असं ती तिच्या अनेक इन्स्टा पोस्टमधनं दाखवताना दिसतेय. सध्या अशीच एक व्हिडीओ पोस्ट आणि त्यासोबत मानसीनं लिहिलेली लांबलचक नोट चर्चेत आली आहे.

हेही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

मानसीनं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे, ''देवानं आज मला सांगितलं....मला माहित आहे सध्याचा काळ तुझ्यासाठी खूप कठीण आहे, आणि तू अनेक चढ-उतारांचा सामना करतेयस आणि भावनांशी तुझा संघर्ष सुरू आहे''.

तू एका अडचणीतून बाहेर येत नाही तर समोर दुसरा संकटात टाकणारा प्रसंग उभा राहतोय.

नेहमीच आपल्या भोवतालच्या वादळाला शांत करण्याची गरज नसते,तुझ्या मनातल्या तीव्र वादळाला शांत करण्याचं काम मी करेन,पण तू हार मानू नकोस.

तुला कदाचित माहितही नसतील अशी संकटं समोर उभी राहतील पण मी त्यावेळी तुझ्या पाठीशी असेन,कायम. तू आणि मी मिळून एकत्रितपणे या संकटाशी दोन हात करूया,जे आपण नेहमी करत आलोय. सगळं नीट होईल. तुला न्याय मिळायला हवा. तुला प्रेम मिळायला हवं''. अशा पद्धतीची एकंदरीत नोट मानसीनं आपल्या व्हिडीओ पोस्टसोबत जोडली आहे.

या व्हिडीओत मानसीनं गुलाबी रंगाची नववारी साडी नेसली आहे. गळ्यात हार, हातात बांगड्या,नाकात नथ,कानात झुमके अनं माथ्यावर लाल बिंदी असा पारंपरिक पेहराव मानसीनं केला आहे. मानसी रफींच्या एका गाण्यावर मुरडताना दिसतेय. पण तिची पोस्ट वाचल्यावर कळत चेहऱ्यावरच्या या हास्याच्या मागे किती दुःख लपलेलं आहे. मानसीनं प्रदीप खरेरा या आपल्या पती विरोधात घटस्फोटाची केस दाखल केली आहे. तिनं काही आरोपही नवऱ्यावर अन् सासरच्यांवर केले आहेत. त्यामुळे आता लवकरात लवकर मानसी या दुःखातून बाहेर येवो आणि नव्या आयुष्याला सुरुवात करो..अशीच प्रार्थना तिचे चाहते करताना दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT