'आयुष्यात सगळंच अनिश्चित...',हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुपाली भोसलेची पोस्ट चर्चेत Marathi Serial,Aai Kuthe Kay karte Actress ,Rupali Bhosle | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Marathi Serial Aai Kuthe Kay karte Actress Admitted In hospital,Post Viral

Marathi Serial: 'आयुष्यात सगळंच अनिश्चित...',हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुपाली भोसलेची पोस्ट चर्चेत

Rupali Bhosle: कलाकार आणि चाहत्यांमध्ये एक वेगळंच बॉन्डिंग असतं. अर्थात हे आधीही होतं पण सोशल मीडियाच्या कलयुगात ते अधिक घट्ट बनत चाललं आहे. अनेकदा कलाकार आपल्या वैयक्तिक आणि करिअरविषयीची अपडेट चाहत्यांना देताना दिसतात. अर्थात चाहते देखील आपल्या लाडक्या कलाकाराविषयी जाणून घेण्यास तेवढेच उत्सुक असतात.

ते आपल्या लाडक्या कलाकाराच्या सुखातच नाहीत तर दुःखातही तितकेच भावूक होताना दिसतात. त्यामुळेच तर कलाकारही आपल्या अडचणींना,दुःखांनाही चाहत्यांसोबत शेअर करताना दिसतात.

आता हे सगळं सांगायचं कारण इतकंच की 'आई कुठे काय करते' अभिनेत्री रुपाली भोसले म्हणजे सर्वांची लाडकी संजना सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेतेय. आणि तिथनं तिनं आपल्या आजारपणाविषयीची एक पोस्ट शेअर केली. अर्थात यानंतर तिचे चाहते मात्र काळजीत पडलेयत अन् ती लवकरात लवकर बरं होण्यासाठी प्रार्थना देखील करताना दिसत आहेत.(Marathi Serial Aai Kuthe Kay karte Actress Admitted In hospital,Post Viral)

हेही वाचा: Bigg Boss Marathi 4: 'तो भावनाशून्य माणूस आहे..', अपूर्वाचा निशाणा नेमका कोणावर?

रुपाली म्हणजे आई कुठे काय करते मालिकेतील संजना सध्या ठाण्याच्या एका हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. तिची एक सर्जरी झाली आहे. तिनं आपल्या आजाराविषयीची माहिती देताना हॉस्पिटलच्या बेडवर आरामा करतानाचे आपले काही फोटो शेअर केले आहेत. फोटोसोबत तिनं एक लांबलचक नोट आपल्या चाहत्यांसाठी लिहिली आहे. आणि आजारपणात सहकार्य करणाऱ्या डॉक्टर्स आणि परिचारिका,हॉस्पिटल स्टाफचे आभार मानले आहेत.

हेही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

रुपाली भोसलेनं आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की,''दुसऱ्यांची काळजी घेताना स्वतःच्या स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करू नका. आपल्या शरीराची,आरोग्याची काळजी आपण घेतलीच पाहिजे. कारण ते जर सुदृढ असेल तरच आपण यशाच्या दिशेने वाटचाल करू शकतो''.

''आपलं आयुष्य खूप अनिश्चित आहे, त्यात घडणारे अनेक प्रसंग कधी कधी न सांगता समोर उभे ठाकतात. पण त्या सगळ्या प्रसंगांचा,अडचणींचा सामना करताना डगमगायचं नाही आपण हसत हसत त्यांना सामोरं जायचं. कारण आयुष्य खूप सुंदर आहे''.

''कालच माझं एक छोटंसं ऑपरेशन झालं. पण आता मी बरी होत आहे. तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादासाठी आणि माझ्यावरील प्रेमासाठी मी आभारी आहे. अनेकदा आपण आपल्याकडे दुर्लक्ष करतो,आपलं शरीर आपल्याला सिग्नल देत असतं,काहीतरी बिघडलं आहे पण आपण त्या थोड्या दुखण्याचं मोठ्या दुखण्यात रुपांतर होईपर्यंत दुर्लक्ष करतो. म्हणूनच माझी सर्वांना मनापासून विनंती आहे की स्वतःची काळजी घ्या, कोणतंही छोटं दुखणं अंगावर काढू नका. डॉक्टरांना दाखवा,त्यांचा सल्ला घ्या,होऊ बरं म्हणून सोडून देऊ नका''.

रुपाली भोसलेनं या पोस्टमध्ये आपल्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे, परिचारिकांचे, हॉस्पिटल स्टाफचे आभारही मानले आहेत.

हेही वाचा: Richa Chadha: भारतीय सैन्याची खिल्ली उडवणारी रिचा पाकिस्तानची बाजू घेतानाही दिसली होती, पहा Viral Video

रुपालीनं ही पोस्ट टाकली नाही तर लगेचच तिच्या चाहत्यांनी आणि इंडस्ट्रीतील काही कलाकार मित्र-मैत्रिणींनी तिला 'लवकर बरी हो' म्हणत आधार दिला आहे. रुपाली सध्या 'आई कुठे काय करते' मालिकेत काम करतेय. संजना हे ती रंगवत असलेलं पात्र मालिकेतील सर्वात प्रसिद्ध पात्रांपैकी एक आहे. सध्या मालिका रंजक वळणावर आहे. रुपालीच्या संजना या व्यक्तिरेखेचा देखील महत्त्वाचा ट्रॅक सुरू आहे. त्यात आता रुपाली हॉस्पिटलमध्ये असल्यानं काही दिवस तरी ती आपल्याला दिसणार नाही यामुळे चाहते मात्र थोडे नाराज झाले असणार हे नक्की. असो,आपण मात्र रुपाली लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना करूया.

टॅग्स :Marathi Actress