Mayuri Deshmukh  instagram
मनोरंजन

मयुरीच्या जीवावर बेतली असती सेटवरची 'ती' चूक; थोडक्यात वाचले प्राण

'इमली'च्या सेटवर घडली ही घटना

सकाळ डिजिटल टीम

अभिनय क्षेत्रात कलाकार आपलं काम चोख करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यासाठी ते अधिक कष्टदेखील घेतात. काम करताना बऱ्याचवेळा त्यांना अनेक भयानक घटनांना सामोरं जावं लागतं. मराठमोळी अभिनेत्री मयुरी देशमुखसोबत (Mayuri Deshamukh) असंच काहीसं घडलं आहे. सध्या मयुरी इमली या हिंदी मालिकेत काम करत आहे. 'इमली'च्या सेटवर तिच्यासोबत नुकतीच एक भयानक घटना घडली आहे.

स्टार प्लसवर येणाऱ्या 'इमली' या मालिकेत मयुरी देशमुख महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. अगदी कमी कालावधीतच या मालिकेला प्रचंड लोकप्रियता मिळाली. नुकताच मालिकेत एक महत्त्वाचा सीन शूट केलं जातं होता. या सीनमध्ये मयुरी एक फोटो घेऊन बसलेली असते आणि या फोटोला आग लावण्याचा सीन होता. सीन शूट करायला सुरुवात झाली आणि अचानक मयुरीच्या लक्षात आलं की आगीची एक ठिणगी तिच्या साडीवर येत आहे. तेव्हा तिने प्रसंगावधान दाखवत लगेचच मागे सरकली. त्यामुळे सुदैवाने तिला कोणतीही इजा झाली नाही. हा व्हिडीओ मयुरीने स्वतः तिच्या इंस्टाग्राम अकांऊटवरून पोस्ट केला आहे. 'प्यार से डर नही लगता साहब, आग से लगता है', असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं आहे.

या मालिकेत मयुरी ही मालिनीची भूमिका साकारत आहे. या मालिकेत मयुरीसह मराठी अभिनेता गश्मीर महाजनी देखील आहे. मयुरीचं काम मराठीप्रमाणेच हिंदी प्रेक्षकांनाही आवडत आहे. अनेक मालिकांमध्ये मयुरीने सोज्वळ आणि समजूतदार अशा भूमिका साकारल्या आहेत. पण या मालिकेत मयुरी खलनायिकाची भूमिका साकारताना दिसत आहे. याआधी मयुरी 'खुलता कळी खुलेना' या मराठी मालिकेतून घराघरात पोहोचली. यात तिने डॉक्टरची भूमिका साकारली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol and Diesel: जीएसटी रिफॉर्म लागू झाल्यानंतर पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार? दिवाळीनंतर काय महाग होणार?

Latest Marathi News Live Updates : मुंबईत मुसळधार पाऊस, परळ-दादर रेल्वे ट्रॅक पाण्याखाली

"मग त्याने एकट्यानेच आर्थिक बाजू का सांभाळावी" तेजश्री प्रधानने टोचले आजच्या तरुणींचे कान, म्हणाली...

Pune News : कोथरुड पोलिसांवर आरोप करणाऱ्या तीन तरुणींसह ५ जणांवर गुन्हा दाखल, मारहाण प्रकरणात नवा ट्विस्ट....

फक्त एक क्लिक...अन् फोनपासून बँक अकाउंटपर्यंत सगळं होईल हॅक, नव्या Captcha Scam चा हाहाकार, 'असं' रहा सुरक्षित

SCROLL FOR NEXT