neha pendse 
मनोरंजन

बी कम्फर्टेबल - नेहा पेंडसे म्हणते, 'बी कम्फर्टेबल'!

सकाळ वृत्तसेवा

मला कोणताही फॅड फॉलो करायला आवडत नाही. कम्फर्टेबल असण्यासोबतच स्टायलिश कपडे घालण्याला प्राधान्य देते. आपण जी स्टाईल करतो, त्या कपड्यांमध्ये जर कम्फर्टेबल असू तरच ते कपडे उत्तम प्रेझेन्ट करू शकतो. कम्फर्टेबल नसू तर ते अवघड होतं, तेच आपल्या चेहऱ्यावरही झळकत असतं.

मी नेहमीच काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नात असते. माझ्या लग्नात मला नऊवारी साडी नेसायची आहे, हे माहिती होतं, पण टिपीकल नऊवारी किंवा नऊवारीमध्ये असलेले कॉमन रंग नको होते.

नऊवारीला एक वेगळा लूक द्यायचा होता. त्यासाठी मी पेस्टल पिंक रंगाची निवड केली. माझ्या लग्नातल्या रिसेप्शनचा अजून एक ड्रेस म्हणजे निळ्या रंगाचा. तो स्वप्नील शिंदे याने डिझाईन केला होता. त्या ड्रेसला प्रिंटेड बनारसी लाँग फ्रिल ट्रेल आहे. ती ट्रेल काढली तर त्या ड्रेसचा वनपीसही होऊ शकतो. मला असे वेगवेगळे आणि युनिक कपडे घालायला जास्त आवडतात.

मला असं वाटतं आपल्याकडेच असलेल्या कपड्यांमध्ये आपण काहीतरी नवीन शोधण्याचा प्रयत्न केला तर आपण नक्कीच काहीतरी नवीन स्टाईल निर्माण करू शकतो. मी तरुणांना आवर्जून सांगू इच्छिते की, एखादा ट्रेंड सुरू आहे म्हणून त्याला फक्त फॉलो करू नका, आपल्यावर काय उठून दिसते आहे याकडे लक्ष द्या. ट्रेंडमध्ये असलेले कपडे आपल्या उंचीला, आपल्या शरीरयष्टीला सूट होत आहेत की नाही, याचं भान ठेवणं जास्त गरजेचं आहे. 

शब्दांकन - स्नेहल सांबरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Ghaywal Acquitted : निलेश घायवळसह सहा आरोपींची निर्दोष मुक्तता; मोका न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

Bank Holiday October 2026: ऑक्टोबरमध्ये बँका 16 दिवस बंद! महाराष्ट्रात किती दिवस सुट्टी? पाहा RBIची संपूर्ण यादी

Chiplun Municipality : चिपळूण नगरपालिकेत नोकरीसाठी 15 लाखांची मागणी? सत्ताधारी नगरसेवकाच्या गंभीर आरोपामुळे खळबळ, प्रशासनाचे स्पष्टीकरण

‘या’ राशींचे लोक असतात खूप जास्त इमोशनल, भावनेच्या भरात घेतात निर्णय, नंतर होतो पश्चात्ताप; त्यांच्या या स्वभावाचा फायदा घेतात लोक

Marathi News Live Updates: मुंबई-अहमदाबाद मार्गावर भीषण वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT