prajakta gaikwad 
मनोरंजन

प्राजक्ता गायकवाडचं 'लॉकडाउन लग्न'

प्राजक्ताने शेअर केलेली लग्नपत्रिका पाहिली का?

शर्वरी जोशी

'स्वराज्य रक्षक संभाजी' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड (prajakta gaikwad). महाराणी येसूबाईंची भूमिका साकारत प्राजक्ताने प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात स्थान मिळवलं. त्यामुळे छोट्या पडद्यावरील लोकप्रिय चेहरा म्हणून प्राजक्ताकडे पाहिलं जातं. परंतु, छोटा पडदा गाजवल्यानंतर प्राजक्ता रुपेरी पडद्यावर झळकण्यास सज्ज झाली आहे. लवकरच ती Lockdown लग्न या आगामी चित्रपटात (movie) झळकणार आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने स्वत: ही माहिती दिली आहे. (marathi actress prajakta gaikwad lockdown lagn new upcoming movie)

सुमित संघमित्रा दिग्दर्शित या चित्रपटाचं अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं असून हे पोस्टर थोडं हटके अंदाजात असल्याचं पाहायला मिळत आहे. प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये अंतरपाट म्हणून मास्कचा वापर करण्यात आला आहे. तर, औक्षणाच्या ताटात सॅनिटायझर, ऑक्सिमीटर ठेवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे मास्कच्या अंतरपाटावर आमंत्रण पत्रिकाही छापल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान, या चित्रपटात प्राजक्ता मुख्य भूमिका साकारत असली तरीदेखील तिच्यासोबत अन्य कोणते कलाकार झळकणार हे मात्र गुलदस्त्यात आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढल्याचं दिसून येत आहे. या चित्रपटाची निर्मिती किरण कुमावत, अमोल लक्ष्मण कागणे, गौरी पाठक करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT