prajakta mali file image
मनोरंजन

प्राजक्ता माळीने कवितेतून दिली प्रेमाची कबुली

अभिनेत्री प्राजक्ता माळीचा चाहता वर्ग मोठा आहे.

प्रियांका कुलकर्णी

मराठी मालिका आणि चित्रपटामधील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळीचा (prajakta mali) चाहता वर्ग मोठा आहे. तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी तिचे चाहते उत्सुक असतात. प्राजक्ताचा ‘प्राजक्तप्रभा’ हा काव्यसंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. या काव्य संग्रहातील कवितांना तिच्या चाहत्यांची पसंती मिळत आहे. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये प्राजक्ताने कॉलेजमध्ये असताना लिहीलेल्या एका कवितेबद्दल सांगितली आहे. (marathi actress prajakta mali confessed her love)

आकरावीमध्ये असताना दिली होती प्रेमाची कबूली

नुकत्याच एका मुलाखतीमध्ये प्राजक्ताने तिच्या आकरावीमधील प्रेमाबद्दल सांगितले. प्राजक्ताने तेव्हा कविता लिहीली होती असं तिने सांगितलं. “प्यार, इश्क, मोहब्बत…ये लब्जभी…सरल शब्द जैसे, सरल नहीं…तो क्या इसके रास्ते और मंजिले क्या खाक सरल होंगे….” अशी कविता प्रजाक्ताने लाल रंगाच्या पेनाने लिहीली होती.

प्राजक्ताच्या ‘प्राजक्तप्रभा’ काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेत्री अमृता खानविलकर, अभिनेता पुष्कर श्रोत्री आणि दिग्दर्शक अभिजित पानसे यांनी हजेरी लावली होती. प्राजक्ताचे काही नातेवाईक आणि सिनेसृष्टीतील मित्रपरिवाराने देखील तिला शुभेच्छा देण्यासाठी या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित होते. त्यावेळी प्राजक्ताने तिच्या अनेक जुन्या आठवणी सांगितल्या. सध्या 'महाराष्ट्राची हास्य जत्रा' या शोचे प्राजक्ता सुत्रसंचालन करत आहे. 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेमधील प्राजक्ताच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. पार्टी, हंपी, डोक्याला शॉट या मराठी चित्रपटांमध्ये प्राजक्ताने महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: चालत्या ट्रेनमधून केसांना धरत तरुणीला बाहेर ओढलं नंतर...; महिलेचं धक्कादायक कृत्य, मुंबई लोकलमधील राड्याचा व्हिडिओ समोर

SL vs NZ, T20 WC: श्रीलंकेच्या गोलंदाजांची दमदार कामगिरी, न्यूझीलंडच्या फलंदाजांची हाराकिरी! पाकिस्तानच्या ताफ्यात आनंद

तीन वेळा डेडलाईन… तरीही योजना कागदावरच का? 'झिरो प्रिस्क्रिप्शन’चा अर्थसंकल्पात स्पष्ट उल्लेख नाही!

Google Search : फेब्रुवारी महिन्यात सगळ्यात जास्त बघण्यात आले 'हे' 5 व्हिडिओ, गुगल सर्च ट्रेंड डेटामुळे जगभर खळबळ

Latest Marathi News Live Update : वाहतूक कोंडीच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी रिपाईचे रास्ता रोको आंदोलन

SCROLL FOR NEXT