Marathi Actress Prajakta Mali Lend Money to Alok Rajwade while Shooting of movie Teen Adkun Sitaram  SAKAL
मनोरंजन

Prajakta Mali: या कारणामुळे सिनेमाच्या शुटींगवेळेस प्राजक्ताने आलोकला पैसे उधार दिले, बघा काय घडलं

प्राजक्ताने आलोकला पैसे उधार दिले, हे आहे कारण

Devendra Jadhav

सध्या मराठी मनोरंजन विश्वात एका सिनेमाची चर्चा आहे. तो म्हणजे तीन अडकून सीताराम. नावापासुनच हा सिनेमा चांगला चर्चेत आहे. प्राजक्ता माळी, वैभव तत्ववादी, आलोक राजवाडे, संकर्षण कऱ्हाडे अशा कलाकारांची फौज या सिनेमात आहे.

सिनेमाचा ट्रेलर काहीच दिवसांपुर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला. आता या सिनेमाच्या शुटींगदरम्यानचा एक खास किस्सा समोर आलाय.

हृषिकेश जोशी लिखित, दिग्दर्शित 'तीन अडकून सीताराम' या चित्रपटाच्या चित्रीकरणानिमित्ताने प्राजक्ता माळी लंडनला गेली होती. लंडनला शुटींगला जाण्यासाठी प्राजक्ता खूपच उत्सुक होती आणि यासाठी दोन कारणे होती. एक म्हणजे लंडनमध्ये चित्रीकरण होते यासाठी आणि दुसरे म्हणजे तिला सौंदर्यप्रसाधनांची आणि इतर बऱ्याच वस्तूंची खरेदी करायची होती.

यासाठी ती भरपूर पैसेही घेऊन गेली होती. मात्र तिची निराशा झाली. ज्या उद्देशाने ती पैसे घेऊन गेली त्याचा फारसा उपयोगच झाला नाही. तिला शुटींगमधून वेळच मिळाला नाही त्यामुळे तिला मनासारखी खरेदीही करता आली नाही. नेमके त्याच वेळी आलोक राजवाडेचे कार्ड बंद पडल्याने आणि प्राजक्ताकडे भरपूर पैसे उरल्याने तिने ते पैसे आलोकला दिले.

याबद्दल प्राजक्ता माळी म्हणते, ''मला लंडनमध्ये खूप खरेदी करायची होती. परंतु माझे शुटींगचे शेड्युल असे होते, की मला खरेदीसाठी वेळच मिळायचा नाही. माझा शॉट अर्धा तासासाठी असला तरी माझा पूर्ण दिवस जायचा. अखेर जायच्या आधी मला केवळ अर्धा दिवस शॉपिंगसाठी मिळाला. त्यात मी माझ्या भाच्यांसाठी आणि जमेल त्या वस्तू खरेदी केल्या. मनासारखी खरेदी न झाल्याने माझे बरेच पैसे उरले. त्यात आलोकला गरज होती म्हणून मी माझ्याकडचे पैसे दिले. अर्थात आलोकने ते पैसे लगेच परत केले.''

सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि. आणि नितीन वैद्य प्रोडक्शन प्रस्तुत लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे आणि नितीन प्रकाश वैद्य निर्मित या चित्रपटात वैभव तत्ववादी, संकर्षण कऱ्हाडे, आलोक राजवाडे, प्राजक्ता माळी, गौरी देशपांडे,आनंद इंगळे, विजय निकम, समीर पाटील आणि हृषिकेश जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT