prajakta mali shared surynamskar video on international yoga day 2022  sakal
मनोरंजन

Yoga Day video : प्राजक्ता माळी ऐकत नाही राव! दणक्यात १०८ सूर्यनमस्कार..

जागतिक योग दिनाच्या निमित्ताने प्राजक्ताने १०८ सूर्यनमस्कार करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

नीलेश अडसूळ

yoga day 2022 : योग साधनेचे आपल्या आयुष्यात किती महत्व आहे या सांगणाऱ्या वेगवेगळ्य पोस्ट आज योग डे च्या निमित्तानं समोर आल्या आहेत. (International Yoga Day 2022) सोशल मीडीयावर बॉलीवूड सेलिब्रेटींनी फोटो शेयर करुन चाहत्यांना योगा डे चे महत्व पटवून दिले. पण यामध्ये आपल्या मराठी अभिनेत्रीही मागे नाही. अनेक मराठी अभिनेत्री दररोज नित्य नियमाने योगा करतात. यामध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळी सर्वात पुढे आहे. योग साधनेविषयी ती वारंवार बोलत असते. आज योगा डे निमित्त तिने चक्क 108 सूर्य नमस्कार घातले आहेत. विशेष म्हणजे याचा खास व्हिडिओ तीने शेयर केला आहे. सोबत एक खास कमेंटही तिने केली आहे. (prajakta mali shared surynamskar video on international yoga day 2022)

प्राजक्ताने (prajakta mali ) दोन दिवसांपूर्वीच एक शेयर केला होता. ज्या व्हिडिओ मध्ये तिने चक्क १०८ सूर्य नमस्कार न थांबता घातले होते. तर सोबत एक भन्नाट कॅप्शन दिले होते. '१०८ सूर्यनमस्कार.. (जागतिक योगा दिनाच्या निमित्ताने, आज केले. योगा दिन २१ ला असतो.) कदाचित २१ ला परत करेन, तुम्ही पण माझ्याबरोबर करणार असाल तर … काय म्हणता, करणार का? (जमेल तितके करा…) असे चॅलेंज तिने चाहत्यांना दिले होते. विशेष म्हणजे हा शब्द तिने स्वतः पाळला. ती आज 21 जून रोजी योगा दिनाच्या निमित्ताने पुन्हा लाईव्ह आली आणि सर्वांसमोर न थांबता 108 सूर्य नमस्कार घातले. तिचा हा व्हिडिओ पाहून चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. मात्र तिने एक भन्नाट कॅपशन या व्हिडिओला दिले आहे.

'पुन्हा एकदा १०८ सूर्यनमस्कार… तुमच्या प्रतिसादामुळे आम्ही पण inspire होत असतो.
खूप धन्यवाद. आणि पुन्हा एकदा जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा. (व्यायाम करून साजरा करा.. { ज्यांनी सूर्यनमस्कार घातले नाहीत त्यांना म्हणतेय}' असे कॅपशन देत तिने ज्यांनी योगा केला नाही त्यांना टोमणा लगावला आहे. प्राजक्ताच्या या योग साधनेचे सर्व स्तरतून कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्कॉर्पिओला आग लागून एकाच कुटुंबातील चौघांचा अंत, मृतांमध्ये ZP सदस्यासह २ माजी सरपंचाचा समावेश

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगेंची पत्रकार परिषद! 30 मे पासून आमरण उपोषण

Badlapur Crime: बदलापुरात वडिलांच्या मित्रानेच १६ वर्षीय मुलीचा केला विनयभंग, मोबाईल चार्जिंगसाठी घरी आला अन्...

Deepali Sayyad Claims : ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’वरून खळबळ! दिपाली सय्यदला धमक्या, “ते नाव घेतलं तर सर्व काही संपेल...”

Kolhapur Student Death Case : बाबा दुप्पट फायदा मिळणार आहेत, पैसे पाठवा..., मुलीचे शेवटचे शब्द, कुटुंबीयांनी नाकारलं विद्यार्थिनीने नको ते केलं

SCROLL FOR NEXT