priya bapat 
मनोरंजन

प्रिया बापट पुन्हा दिसणार 'लेस्बियन' महिलेच्या भूमिकेत!

सकाळन्यूजनेटवर्क

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया बापट सध्या चित्रपटांसोबत वेब सिरीजमध्येही दिसत आहे.  सिटी ऑफ ड्रिम्स या वेब सिरीजमध्ये प्रियाने लेस्बियन महिलेची भूमिका केली. या सिरीजमध्ये तिचा एक किसिंग सिन होता. त्यावेळी या सिनची बरीच चर्चा झाली होती. 

प्रिया सिटी ऑफ ड्रिम्स नंतर आता पुन्हा एका चित्रपटात लेसबियन महिलेच्या भूमिकेत दिसणार आहे. 'फादर लाईक' असे प्रियाच्या नव्या  चित्रपटाचे नाव आहे. हा चित्रपट प्रियाचा पहिला आंतरराष्ट्रीय सिनेमा आहे. त्यामुळे ती या चित्रपटाबद्दल खूप उत्साही आहे. फादर लाईक मधील प्रियाच्या भूमिकेचे नाव सराह आहे. प्रियाला या चित्रपटात एक लेस्बियन गर्लफ्रेंड असते तिची भूमिका अभिनेत्री गितीका विद्या ओहलान साकारणार आहे. गितीकाच्या भूमिकेचे नाव सेरेना असे आहे. सिंगापूरला लॉकडाऊनमध्ये सेरेना अडकते. सेरेना आणि सराह यांच्यातील लॉकडाऊनमधील लॉंग डिस्टन्स रिलेशनशीप या चित्रपटात दाखवले आहे. लवकरच सिंगापूरमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होणार आहे. .

प्रिया 'सिटी ऑफ ड्रिम्स'च्या दुसऱ्या सीझनमध्येही दिसणार आहे. प्रियाने दुसऱ्या सीझनचे शूटिंग पूर्ण केले आहे. मुन्नाभाई एम बी बी एस, लगे रहो मुन्ना भाई या हिंदी चित्रपटांमधून प्रियाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. तसेच वजनदार, टाईमपास-2, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, काकस्पर्श या प्रियाच्या मराठी चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. हिंदी आणि मराठी चित्रपटांनंतर आता अंतरराष्ट्रीय चित्रपटात प्रियाचा अभिनय पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Open or Closed Update: अनंत चतुर्थीला महाराष्ट्रात बँका सुरू की बंद? RBI कडून मोठी अपडेट

Nandigram By-Election Symbol Controversy : निवडणूक आयोगाचा कारभार पुन्हा चव्हाट्यावर; 183 चिन्हं असताना 'लिफाफा' वरच वाद का? हायकोर्टानं कोणाला सुनावलं?

Thane Water Supply: ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! २४ तास पाणीकपात, कोणत्या भागांना फटका?

Latest Marathi News Live Update : मतचोरी करून खासदार झालेले कायदा बनवतायत : राहुल गांधी

Rare Otters in Sangli : सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! कृष्णा नदीपात्रात पहिल्यांदाच आढळला दुर्मिळ पाणमांजरांचा कळप; 8 ते 9 पाणमांजरं दिसली एकत्र

SCROLL FOR NEXT