rashmi house 
मनोरंजन

'आमच्या स्वप्नांची गुरुकिल्ली'; मराठी अभिनेत्रीने मुंबईत घेतलं घर

स्वाती वेमूल

मुंबईत आपलं हक्काचं घर असावं, हे अनेकांचं स्वप्न असतं. हे स्वप्न पूर्ण करणं सहजशक्य नाही. त्यासाठी काहीजण आपली आयुष्यभराची जमापुंजी घरासाठी देतात, तर काहीजण वर्षानुवर्षे मेहनत करून स्वत:चं घर खरेदी करतात. हीच स्वप्नांची गुरुकिल्ली आता एका मराठी अभिनेत्रीला मिळाली आहे. 'फ्रेशर्स' मालिकेतील अभिनेत्री रश्मी अनपट हिने मुंबईत हक्काचं घर विकत घेतलं आहे. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत तिने चाहत्यांना ही आनंदाची बातमी सांगितली. 

'ही फक्त चावी नाहीये, आमच्या स्वप्नांची गुरुकिल्ली आहे. आमच्या संघर्षाचं, यशाचं, प्रेमाचं, आनंदाचं आणि सुखी संसाराचं प्रतीक. अनेक गोड आठवणी निर्माण करणारी.. आमच्या स्वतः च्या, हक्काच्या मुंबईतील पहिल्या घराची चावी,' अशी पोस्ट तिने लिहिली आहे. यासोबतच तिने घराच्या चावीचा फोटो पोस्ट केला आहे. रश्मीने पती अमित खेडेकर व मुलासोबत गृहप्रवेश करतानाचा व्हिडीओसुद्धा पोस्ट केला आहे. 

रश्मीने डिसेंबर २०१३ मध्ये अभिनेता अमित खेडेकरशी लग्नगाठ बांधली. या दोघांना एक मुलगा आहे. रश्मीने 'फ्रेशर्स', 'पुढचं पाऊल' यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. तर अमितने 'हिरकणी' या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : राज्यात अवकाळी अन् गारपिटीचे संकट, ७ जिल्ह्यांना अलर्ट जारी; पुढील २ दिवस धोक्याचे

Latest Marathi News Live Update : आजचा दिवस प्रत्येक हिंदू आणि मराठी माणसासाठी अत्यंत महत्त्वाचा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गुढीपाडव्यानिमित्ताने वक्तव्य

Pune Satara Highway: पुणे-सातारा महामार्गावर हरिश्चंद्री येथे तीन फूट पाणी; गारांसह जोरदार अवकाळी पाऊस, पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा!

Unseasonal Rain: अवकाळी पावसाचा पिकांना दणका! राज्यभरात फळबागांचे मोठे नुकसान; तासभर गारांचा मारा..

Chandrashekhar Bawankule: राज्यातील जमिनींचे ‘मायक्रो झोनिंग’ होणार: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे; मुद्रांक सुधारणा विधेयक मंजूर!

SCROLL FOR NEXT