अश्लील चित्रफित निर्मितीप्रकरणी व्यावसायिक व अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा Shilpa Shetty पती राज कुंद्राला Raj Kundra मुंबई गुन्हे शाखेने १९ जुलै रोजी अटक केली. राजने पॉर्न चित्रफित निर्माण करून त्याच्या प्रसारणासाठी 2019 मध्ये आर्म्स प्राईम मीडिया नावाने कंपनी स्थापन केली. या कंपनीच्या माध्यमातून पॉर्न चित्रफिती प्रसारणासाठी तयार करण्यात आलेले हॉटशॉट्स नावाचे ॲप्लिकेशन लंडनस्थित केनरीन कंपनीला विकले. पण या ॲप्लिकेशनबाबतची बरीच कामे कुंद्रामार्फतच चालू होती. आता राज कुंद्राप्रकरणी पहिल्यांदाच एक मराठी अभिनेत्री समोर आली आहे. राज कुंद्राच्या प्रॉडक्शन हाऊसकडून ऑफर आल्याचा खुलासा अभिनेत्री मनिषा केळकरने Manisha Kelkar केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तिने याबद्दल सांगितलं आहे.
"मला एका कास्टिंग डायरेक्टरने ऑफर दिली होती. राज कुंद्राचा हा प्रोजेक्ट आहे आणि त्यासाठी काही फोटो, व्हिडीओ शूट करणार आहोत, असं त्यांनी सांगितलं होतं. त्यावेळी अॅप अद्याप लाँच झाला नव्हता. फोटोग्राफ्स आणि व्हिडीओ कशासाठी किंवा नेमका काय प्रोजेक्ट आहे ते त्यांना विचारलं असता समाधानकारक उत्तर मिळालं नाही. मला त्यात काही तथ्य वाटलं नाही, म्हणून मी त्यांना नकार दिला. त्यानंतर त्यांचा पुन्हा मला कधी कॉल आला नाही. साधे फोटोशूट्स असतील असं त्यांनी सांगितलं होतं. न्यूडिटी वगैरेचा उल्लेख त्यांनी केला नव्हता," असं मनिषा केळकरने सांगितलं.
यावेळी मनिषाने इंडस्ट्रीतील तरुणींना, मुलींनाही सल्ला दिला. "आपल्याला कशा पद्धतीची ऑफर दिली जातेय, हे कळू लागतं. मुलींनी आपला सेन्स जागृत ठेवायला हवा. आपण कोणत्या गोष्टींना हो म्हणतोय, का म्हणतोय याचा विचार करावा. बोल्ड सीन्स करतानाही कथेला त्याची खरंच गरज आहे का, असा प्रश्न स्वत:ला एकदा विचारावा", असं ती म्हणाली. मनिषाने मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. मनिषा ही फॉर्म्युला ४ रेसर सुद्धा आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.