अभिनेत्री रुचिता जाधव लवकरच आयुष्याच्या एका नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. 'लव्ह लग्न लोचा' ही मालिका आणि 'भुताचं हनिमून', 'माणूस एक माती' या चित्रपटात भूमिका साकारणारी रुचिता व्यावसायिक आनंद मानेशी लग्नगाठ बांधणार आहे. येत्या ३ मे रोजी पंचगणीतल्या एका खासगी फार्महाऊसवर हा लग्नसोहळा पार पडणार आहे. कोरोनाची परिस्थिती पाहता या विवाहसोहळ्याला फक्त दोघांचे कुटुंबीय आणि जवळचा मित्रपरिवार उपस्थित राहणार आहे.
रुचिता आणि आनंद यांचं हे अरेंज मॅरेज असून याविषयी तिने 'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. "आमचं अरेंज मॅरेज असून गेल्या वर्षी लॉकडाउन जाहीर होण्याआधी आम्ही एकमेकांना भेटलो होतो. ती खूपच सहज भेट होती, कारण लग्नाचा निर्णय जरी मी घेतला असला तरी तेव्हा मानसिकदृष्ट्या मी तयार नव्हती. मुंबईत आमची पहिल्यांदा भेट झाली आणि आम्ही सहज एकमेकांविषयी गप्पा मारल्या", असं ती म्हणाली.
हेही वाचा : एका प्रश्नाने बदललं लारा दत्ताचं आयुष्य; पटकावला 'मिस युनिव्हर्स'चा किताब
पहिल्या भेटीनंतर लगेचच लॉकडाउन जाहीर झाल्यामुळे नंतर दोघांना फारसं भेटता आलं नाही पण ते एकमेकांच्या सतत संपर्कात होते. "जरी मी माझ्या कामामुळे त्याला मेसेज करू शकले नसले तरी आनंद नेहमीच माझ्याशी बोलण्यासाठी वेळ काढायचा. शूटिंग सुरू झाल्यानंतर आम्ही पुन्हा एकमेकांना भेटू लागलो आणि डिसेंबर २०२० मध्ये आम्ही लग्नाचा निर्णय घेतला. आम्हा दोघांच्या कुटुंबीयांना एकमेकांना जाणून घेण्यासाठी आम्हाला पुरेसा वेळ दिला आणि त्यामुळेच आमच्यात जवळीक वाढली", असं तिने सांगितलं.
९ एप्रिल रोजी आनंदने रुचिताला लग्नासाठी प्रपोज केलं. पंचगणी या ठिकाणी मेहंदी, साखरपुडा, हळद, संगीत आणि लग्न असा कार्यक्रम तीन दिवसांत पार पडणार आहे. या लग्नसोहळ्यात रुचिता तिच्या आईने लग्नात नेसलेली साडी परिधान करणार आहे. त्याचप्रमाणे निर्बंध शिथिल झाल्यानंतर मित्रमैत्रिणींसाठी पार्टीचं आयोजन करणार असल्याचंही तिने सांगितलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.