marathi actress rupali bhosle from aai kuthe kay karte special post for marathi serial set SAKAL
मनोरंजन

Rupali Bhosle: "गेली ४ वर्ष आमच्या सेटवर...", 'आई कुठे काय करते' फेम रुपाली भोसलेचा मोठा खुलासा

रुपाली भोसलेने तिच्या मनातली इच्छा व्यक्त केलीय

Devendra Jadhav

Aai Kuthe Kay Karte Rupali Bhosle News: आई कुठे काय करते फेम अभिनेत्री रुपाली भोसले सोशल मीडियावर सक्रीय असते. रुपाली गेली २ - ३ वर्ष 'आई कुठे काय करते' मधील संजनाच्या भूमिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय.

रुपाली भोसले सोशल मीडियावर विविध पोस्टच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते. नुकतीच रुपालीने सोशल मीडियावर पोस्ट केलीय. यात तिने मनातली एक इच्छा व्यक्त केलीय.

रुपालीने व्यक्त केली मनातली इच्छा

रुपाली भोसलेने आई कुठे काय करते मालिकेच्या सेटवरचा एक व्हिडीओ पोस्ट केलाय. हा व्हिडीओ पोस्ट करुन रुपाली लिहीते, "हा आहे आमचा सेट आणि प्रत्येक वेळी आर्ट डिपार्टमेंट कमाल सेट उभा करतात तेही खुप कमी वेळात. आज मी गेली ४ वर्षा आमच्या सेट वर हे बघते. काल ही तयारी बघत असताना मनात असा विचार आला की, जसं नाटकाच्या नेपथ्यासाठी बक्षीस दिल जातं, सिनेमाच्या सुद्धा दिलं जातं तसंच मालिकेसाठी सुद्धा आवश्यक आहे. कारण खरंच खुप मेहनत आणि कमाल काम करतात ही मंडळी आणि ते ही रोज.. मालिका विश्वातल्या आर्ट डिपार्टमेंटच्या संपूर्ण टीमचं कौतुक! तुम्हा सर्वांमुळे प्रत्येक फ्रेम सुंदर दिसते शूटिंगचा सेट घर बनतो. श्री, निवृत्ति, मयुर, आणि परेश सावंत कमाल Good Job Guys."

रुपालीची संजनाची भूमिका लोकप्रिय

स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते ही लोकप्रिय मालिका. रुपाली या मालिकेत संजनाची भूमिका साकारत आहे. सुरुवातीला संजनाची भूमिका काहीशी खलनायकी स्वरुपाची होती. पण आता मालिकेत संजनाचा स्वभाव बदललेला दिसतोय. रुपालीला सुद्धा या भूमिकेतून भरपूर प्रसिद्धी मिळाली आहे. आई कुठे काय करते मालिकेच्या निमित्ताने रुपालीच्या फॅन फॉलोईंगमध्ये खुप वाढ झालीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT