marathi actress sai lokur became mother of beautiful baby daughter  SAKAL
मनोरंजन

Sai Lokur Mother: अभिनेत्री सई लोकूर झाली आई, सोशल मीडियावर शेअर केली आनंदाची बातमी

सई लोकूरने सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी शेअर केलीय. सविस्तर वाचा

Devendra Jadhav

Sai Lokur Mother News: मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री सई लोकूर आई झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासुन सईचे प्रेग्नंसी फोटोशूट चर्चेत होते. आता नुकतंच सईने सोशल मीडियावर आई झाल्याची गुड न्यूज सर्वांसोबत शेअर केलीय. सईला कन्यारत्न प्राप्त झाले असून आज १७ फेब्रुवारीला सईने मुलीला जन्म दिलाय.

सईने सोशल मीडियावर शेअर केली गुड न्यूज

"बाळ सुदृढ, सुंदर असुन ती जन्माला येताच अनेकांचं तिला प्रेम मिळालंय. या काळात तुम्ही आमच्यावर जो प्रेमाचा वर्षाव केला आणि पाठिंबा दिला, त्याबद्दल मी ऋणी आहे. आम्ही खुप आनंदात आहे. आई - बाबा झालेले सई - तीर्थदीप."

अशी पोस्ट करत सईने ही आनंदाची बातमी सर्वांसोबत शेअर केलीय

आई आणि बाळ दोघेही ठीक

सई लोकूरच्या सोशल मीडिया टीमने पोस्ट केलीय की, "एका छोट्या चेहऱ्यावर देवाचा आशिर्वाद. आमच्या बाळाच्या आगमनाची घोषणा करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. आई आणि बाळ दोघेही ठीक आहेत. सर्व प्रेम आणि शुभेच्छांसाठी धन्यवाद." अशी पोस्ट सईच्या सोशल मीडिया टीमने शेअर केलीय. सईला कन्यारत्न प्राप्त झाल्याबद्दल अनेक कलाकारांनी आणि तिच्या चाहत्यांनी कमेंटमध्ये तिचं अभिनंदन केलंय

एक विलक्षण योगायोग

दरम्यान सईला मुलगी झाल्याने तिचा काही दिवसांपुर्वीचा व्हिडीओ चर्चेत आलाय. सई लोकुरने सोशल मीडियावर डोहाळेजेवणाचा व्हिडीओ शेअर केला होता. त्यावेळी सईच्या समोर दोन वाट्या ठेवल्या होत्या. एका वाटीत गुलाबजाम असतो तर दुसऱ्या वाटीत खीर होती. सईने त्यावेळी जी वाटी उचलली त्यात खीर होती. आणि आज सईला मुलगी झाल्याने असा योगायोग जुळून आलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : शक्तीपीठ विरोधात १३ जिल्ह्यांत जमीन मोजणीला वेग?, लातूर, हिंगोलीतून विरोधक एकवटणार; कोल्हापुरातील बैठकीत नेमकं काय घडलं

Mumbai: पनवेल-कर्जत लोकल लवकरच सुरु होणार, दररोज ५० गाड्या धावणार; प्रवाशांना दिलासा मिळणार!

Congress High Drama : "कसले अध्यक्ष?"; विचारताच काँग्रेस कार्यालयात तुफान राडा, नेत्यांवर थेट चप्पल-बुटांचा मारा!

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याच्या मतमोजणीसाठी वाहतुकीत बदल; बारामती-निरा मार्गावरील रस्ता २४ तास बंद, नेमका कसा असेल बदल?

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT