Sai Tamhankar Esakal
मनोरंजन

Sai Tamhankar: सईची लागली लॉटरी! 'मिमी'नंतर 'या' बड्या दिग्दर्शकासोबत करणार चित्रपट!

Vaishali Patil

Marathi Actress Sai Tamhankar next movie: मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री म्हणुन सई ताम्हणकरचं नाव घेतलं जात. सई नेहमीच वेगळेपणासाठी ओळखली जाते. तिनं मराठी मनोरंजनसृष्टीबरोबरच बॉलिवूडमध्येही धमाकेदार अभिनयानं प्रेक्षकांची मन जिंकली आहे.

तिनं हिंदी, मराठी चित्रपट, मालिका, वेबसिरिज सगळ्यात तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मन जिंकली आहे. सई नेहमी तिच्या वेगळेपणासाठी आणि बोल्डनेससाठी ओळखली जाते.

सई ही अभिनयाबरोबरच सोशल मिडियावरही देखील खुप सक्रिय असते. नेहमी काही ना काही पोस्ट करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. तिच्या मिमी या चित्रपटातील अभिनयाचं सर्वांनीच कौतुक केलं. तिला या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्कारानं गौरविण्यात आले होतं. आता सईनं पुन्हा चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेयर केली आहे.

मिमीनंतर सई पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये धमाका करण्यासाठी सज्ज झाली आहे. सईने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीद्वारे तिच्या चाहत्यांना ही बातमी दिली आहे. इतकच नाही तर ती बड्या दिग्दर्शकासोबत काम करणार आहे. यास्टोरीत तिने एक नोट शेयर केली आहे.

“प्रिय सई, तुझ्याबरोबर पुन्हा एकदा काम करण्यासाठी आम्ही खुप उत्सुक आणि आनंदी आहोत. आमच्या टीममध्ये तुझे अगदी मनापासून स्वागत… तूझ्यासोबत या नव्या प्रवासाला सुरुवात करतांना आनंद आहे” असं या नोटमध्ये लिहिलं आहे.

या पत्रातच्या खाली प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेता फरहान अख्तर याचे नाव आहे. तसेच या पत्रावर एक्सेल एंटरटेनमेंटचा लोगो देखील दिसतोय. याचाच अर्थ म्हणजे सई दिग्दर्शक फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्यासोबत काम करणार आहे.

मात्र सईने या चित्रपटाचं नाव चाहत्यांना सांगितलेलं नाही. एक्सेल एंटरटेनमेंटबद्दल बोलायचं झालं तर हे प्रोडक्शन हाऊस सध्या 'फुक्रे 3' आणि 'डॉन ३' या चित्रपटांसाठी चर्चेत आहे.

त्यामुळे आता सई या दोन्ही चित्रपटापैकी एकात दिसेल की वेगळ्याच प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे हे जाणुन घेण्यासाठी प्रेक्षक उत्सूक आहेत. लवकरच सईच्या या चित्रपटाच्या नावाचा खुलासा होईल अशी आशा तिच्या चाहत्यांना आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT