marathi actress sanskruti balgude talks about what is love and her past relationship experience  sakal
मनोरंजन

Sanskruti Balgude: माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे, पण तो मात्र.. प्रेमाविषयी संस्कृतीचा मोठा खुलासा..

अभिनेत्री संस्कृती बालगुडे प्रेमाविषयी सगळंच बोलून गेली..

नीलेश अडसूळ

sanskruti balgude : मराठी मनोरंजन विश्वातील एक नामांकित अभिनेत्री म्हणजे संस्कृती बालगुडे. आजवर तीने अनेक मालिका, चित्रपटातून आपले मनोरंजन केले. याशिवाय ती उत्तम नृत्यांगना आहे.

संस्कृती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. अनेकदा तिचे फोटो आणि पोस्ट व्हायरल होताना दिसतात. तिच्या ग्लॅमरस लुकचे लाखो दिवाने आहेत. लवकरच ती चौक या चित्रपटातून झळकणार आहे.

संस्कृती विविध कारणाने कायमच चर्चेत राहिली आहे. पण आजवर तिचे नाव अनेक कलाकारांसोबत जोडले गेले, पण ती कधीही आपल्या प्रेमाविषयी मोकळेपणाने बोलली नाही. पण नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीती तीने प्रेमाविषयी मोठा खुलासा केला आहे.

(marathi actress sanskruti balgude talks about what is love and her past relationship experience )

सध्या संस्कृतीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिला प्रेम म्हणजे तुझ्यासाठी नेमकं काय? असं विचारलं गेलं. त्यावर उत्तर देताना संस्कृती म्हणाली, 'प्रेम म्हणजे.. असं म्हणतात की, अशा माणसासोबत रहा की ज्याचं तुमच्यावर खूप जास्त प्रेम असेल.. तुमचं त्याच्यावर असण्यापेक्षा. आणि हे खूप खरं आहे..'

पुढे ती म्हणते, 'कारण मी दोन्ही प्रकारचं प्रेम अनुभवलं आहे. ,माझं एकावर अत्यंत प्रेम आहे.. पण त्यांचं मात्र थोडं कमी पडतंय.. आणि असंही प्रेम पाहिलं आहे की, त्याचं अत्यंत प्रेम आहे माझ्यावर पण माझ्याकडून कमी पडतंय..'

'त्यामुळे या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. थोडक्यात प्रेम म्हणजे काय . की अशी व्यक्ती जी तुम्हाला तुम्ही जसे आहात तसं स्वीकारेल.. आणि तशी व्यक्ती मिळणं हेच अवघड आहे . ' असं संस्कृती या मुलाखतीत प्रेमा विषयी बोलली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway Security Breach: एक्सप्रेस ट्रेनमध्ये धक्कादायक प्रसंग! इंजिनमध्ये बोगस लोको पायलट रंगेहात पकडला, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

Rohit Pawar: अतिवृष्टग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत करा; तर सरकाला श्वास घेणेही घेणे अवघड होईल, आमदार रोहित पवार....

Pune Traffic Update : महत्त्वाची बातमी! पुण्यात आज 'या' मार्गावरील वाहतूक दुपारी 1 ते 4 च्या दरम्यान बंद राहणार; पर्यायी मार्ग कोणते?

Ramdas Kadam : 'बाळासाहेबांचा मृतदेह २ दिवस मातोश्रीवर ठेवला' ही माहिती रामदास कदमांना कुणी दिली? स्वत: सांगितलं नाव...

Maharashtra tourism : महाराष्ट्राचे दार्जिलिंग! फोफसंडी गावाची या खासियत तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT