मनोरंजन

अति घाई संकटात नेई; सुप्रिया पिळगांवकर NGOला मदत करायला गेल्या पण..

आपल्या अभिनयानं मराठी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्री म्हणून सुप्रिया पिळगांवकर यांचे नाव घेता येईल.

युगंधर ताजणे

आपल्या अभिनयानं मराठी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्री म्हणून सुप्रिया पिळगांवकर यांचे नाव घेता येईल. केवळ मराठीच नाही तर त्यांनी हिंदी चित्रपट, मालिकांमधूनही प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ त्यांचा मनोरंजन क्षेत्रात वावर आहे. त्या सोशल मीडियावरही चर्चेत असतात. त्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असतात. सध्या त्या चर्चेत आल्या आहेत. त्याचे कारण म्हणजे त्यांना ऑनलाईन मदत करताना आलेला धक्कादायक अनुभव. एका एनजीओला मदत करताना त्यांची ती मदत दुसऱ्याच एका संस्थेला गेल्याचे दिसून आले आहे. त्याबद्दल त्यांनी व्टिट करुन माहिती दिली आहे.

सुप्रिया पिळगांवकर यांनी सांगितलं की, त्यांनी साईट सेव्हरसीन नावाच्या एका एनजीओला मदत केली. त्यांनी ही मदत आर्थिक स्वरुपात केली. यासाठी त्यांनी काही रक्कम ही त्या संस्थेच्या बँक खात्यामध्ये वर्ग केली. ती रक्कम त्या संस्थेला पोहचल्याचा मेसेजही त्यांना त्यांच्या पेटीएमवर आला. त्यानंतर त्यांनी संबंधित एनजीओशी संपर्क साधला असता त्या संस्थेनं अद्याप आपल्याला ती मदत मिळाली नसल्याचे सांगितले. प्रत्यक्षात ती मदत दुसऱ्या एका अकाउंटला गेल्याचे अभिनेत्री सुप्रिया यांचे म्हणणे आहे.

जेव्हा आपण पैसे पाठविण्यासाठीचा व्यवहार केला आणि तो पूर्ण झाला तेव्हा स्क्रीनवर सक्सेसफुल असा मेसेज आला. मात्र ती मदत दुसरीकडेच गेली. असं सुप्रिया यांनी सांगितलं आहे. त्यावर त्यांनी नागरिकांना यापुढे कुणालाही मदत पाठवताना आपण ज्या संस्थेचं नाव नमुद करतो आहोत ते पुन्हा एकदा तपासण्याची विनंती केली आहे. आपल्याकडून घाईत ट्रान्झेक्शन करताना काही राहून गेल्याचं त्यांनी यावेळी व्टिटमधून सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'प्रेग्नंट पत्नी गाडीत, मला जाऊ द्या', पतीचा भररस्त्यात ठिय्या; राज्यपालांसाठी रस्ता बंद केल्यानं वाहतूक कोंडी, VIDEO VIRAL

Navi Mumbai: लेकाकडून आई-वडिलांचा अमानुषपणे छळ, मारहाण करत घरातून हाकललं अन्...; निर्दयी मुलाच्या कृत्याने नवी मुंबईत खळबळ

'ती सध्या काय करते' तेजश्रीसाठी अंकुश चौधरीची खास पोस्ट, व्हिडिओ शेअर करत म्हणाला...

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत मोठी कारवाई! अपात्र लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार?; फडणवीसांची माहिती

गुरु गोचरामुळे दोन राशींच्या लोकांची होणार प्रगती ! जाणून घ्या आजचे तुमचे आर्थिक राशिभविष्य

SCROLL FOR NEXT