Marathi actress surbhi bhave appeals not to burst crackers in Diwali 2023  SAKAL
मनोरंजन

Diwali 2023: "जे मला उपदेशाचे डोस पाजतील त्यांना..." मराठी अभिनेत्रीने केले फटाके न फोडण्याचं आवाहन

चंद्रमुखी सिनेमात झळकलेल्या मराठी अभिनेत्रीने फटाके न फोडण्याचं आवाहन केलंय

Devendra Jadhav

सध्या सगळीकडे दिवाळीची धामधूम सुरु आहे. आकाशकंदील, दिवे, फराळ अशा अनेक गोष्टींनी दिवाळी घराघरात उत्साहात साजरी केली जात आहे. यंदा प्रदुषणात वाढ झाल्याने अनेक जाणकार मंडळी फटाके न फोडण्याचे आवाहन करत आहे.

अशातच एका मराठमोळ्या अभिनेत्रीने फटाके न फोडायचं आवाहन करतानाच तिच्या आयुष्यातला एक खास किस्सा सांगितला आहे.

चंद्रमुखी सिनेमात झळकलेली आणि भाग्य दिले तू मला मालिकेत झळकलेली अभिनेत्री सुरभी भावेने दिवाळीत फटाके न फोडण्याचं आवाहन केलंय.

सुरभी लिहीते, "दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा !! ह्या निमित्ताने एक आवाहन हवेत आधीच खूप प्रदूषण आहे त्यात फटाके वाजवून भर टाकण्यापेक्षा एकमेकांच्या घरी जाऊन भेटू शकतो किंवा उत्तम वाचन ,उत्तम सिनेमा ,उत्तम नाटक असे सर्व पाहून दिवाळी साजरी करू शकतो ..."

सुरभी पुढे लिहीते, "P.S आता जे मला उपदेशाचे डोस पाजतील की तू पण फटाके वाजवतच असशील वगैरे तर त्यांच्यासाठी.. मी 4थी मध्ये असताना कारगिल युद्ध झालेलं त्यावेळी मी फटाके न घेता गावात पैसे गोळा करून ते सैनिकांना दिलेले तेव्हापासून मी जे फटाके वाजवणं बंद केलं ते आजतागायत मी फुलबाजी पण लावलेली नाही."

अशाप्रकारे सुरभीने फटाके न वाजवण्याचं आवाहन केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : जेजुरीजवळ ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी रुग्णालयात जाऊन जखमींची केली विचारपूस

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT