marathi actress swanandi tikekar wedding photos viral with singer ashish kulkarni  SAKAL
मनोरंजन

Swanandi Tikekar Wedding: आयुष्यभराची 'आनंदी' साथ! स्वानंदी - आशिष अडकले लग्नबंधनात

मराठमोळी अभिनेत्री स्वानंदी टिकेकरच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत

Devendra Jadhav

Swanandi Tikekar Wedding News: अभिनेत्री स्वानंदी टिकेकरच्या लग्नाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. स्वानंदी - आशिष यांची हळद, संगीत, मेहंदीच्या फोटोंना लोकांनी पसंती दिली.

अखेर स्वानंदी - आशिष आज लग्नबंधनात अडकले आहेत. स्वानंदी - आशिष यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

स्वानंदी - आशिषच्या लग्नाच्या फोटोंना पसंती

स्वानंदी - आशिषने नुकतेच त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेत. या फोटोत स्वानंदीने जांभळ्या रंगाची पैठणी साडी नेसली असून आशिषने पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केलाय. आशिषने लग्नात स्वानंदीच्या साडीला मॅचिंग असं उपरणं परिधान केलंय.

स्वानंदीने सोन्याचे दागिने घातले असून आशिषने मोत्यांची माळ घातलीय. दोघांच्या लग्नाच्या फोटोंना त्यांच्या फॅन्सनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. आयुष्यभराची आनंदी साथ असं कॅप्शन देत त्यांनी हे फोटो शेअर केलेत

स्वानंदीच्या संगीत सोहळ्यात आई - बाबांनी धरला ठेका

स्वानंदीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर लग्नाआधी झालेल्या संगीत सेरेमनीचा व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओत स्वानंदीच्या संगीत सोहळ्यासाठी तिचे कुटुंबिय आणि इंडस्ट्रीतले मित्र - मैत्रीण दिसले. (At Swanandi's music festival)

या सोहळ्यासाठी स्वानंदीच्या आई - बाबांनी खास डान्स करताना दिसला. याशिवाय सुव्रत जोशी, सखी जोशी, जुईली जोगळेकर, रोहित राऊत अशा अनेक कलाकारांनी धम्माल केलेली दिसली.

कोण आहे स्वानंदीचा नवरा?

स्वानंदीच्या नवऱ्याचं नाव आहे आशिष कुलकर्णी आशिष कुलकर्णी हा संगीतकार आहे. आशिष कुलकर्षी हा गायक - संगीतकार आहे. तो इंडीयन आयडॉल 12 व्या सीझनमध्ये सहभागी होता. आशिष कुलकर्णी स्वत:चे लाईव्ह शोज सुद्धा करतो. (Who is Swanandi's boyfriend?)

आशिष आणि स्वानंदी बऱ्याच दिवसापासून एकमेकांना डेट करत होते. आता दोघांचं लग्न झालं असल्याने त्यांचे चाहते खुप खुश आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Closing: सेन्सेक्स 176 अंकांनी घसरणीसह बंद; मेटल आणि आयटीमध्ये जोरदार विक्री, कोणते शेअर्स वाढले?

IND vs ENG 3rd Test: जसप्रीत बुमराह IN, मग कोण OUT? लॉर्ड्स कसोटीसाठी इरफान पठाणने निवडली Playing XI; अशीच असेल टीम इंडिया

EMI Debt Trap: मध्यमवर्ग ईएमआयच्या जाळ्यात; 5 पैकी 3 लोकांवर तीनपेक्षा जास्त कर्ज, काय आहे कारण?

Latest Maharashtra News Live Updates: पूर्व विदर्भातील पूरस्थिती नियंत्रणात: एसडीआरएफ आणि एनडीआरए यंत्रणा सज्ज

Devendra Fadnavis : ''मीसुद्धा तो व्हिडीओ बघितला, पण...''; संजय गायकवाडांनी केलेल्या मारहाणीवर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

SCROLL FOR NEXT