Swarada Thigale  
मनोरंजन

स्वरदा ठिगळे साकारणार ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’

राज्यभरातून तब्बल चारशे जणांच्या ऑडिशन्समध्ये अनेक नामवंत ते नवोदित अभिनेत्री सहभागी झाल्या होत्या.

स्वाती वेमूल

राज्यभरातून तब्बल चारशे जणांच्या ऑडिशन्समध्ये अनेक नामवंत ते नवोदित अभिनेत्री सहभागी झाल्या होत्या.

सोनी मराठी वाहिनीवरील आगामी ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेचा टिझर गेले काही आठवडे चर्चेचा विषय ठरला. या मालिकेत मध्यवर्ती भूमिका कोण साकारणार ही उत्सुकता शिगेला पोहोचली होती. यासंदर्भात सोशल मिडियावर विविध अभिनेत्रींच्या नावांची चर्चा सुरू होती. डॉ. अमोल कोल्हे आणि जगदंब क्रिएशन्स या मालिकेची निर्मिती करत असून आतापर्यंत स्वराज्याचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मांडणाऱ्या मालिका या निर्मितीसंस्थेने प्रेक्षकांना दिल्या आहेत.

‘जीवात जीव आणि श्वासात श्वास असेपर्यंत हे स्वराज्य अबाधित राहील आणि त्या औरंग्याची कबर दख्खनच्या मातीत खोदली जाईल’ हे ताराराणींचे जाज्वल्य निष्ठा आणि करारीपणा व्यक्त करणारे स्वराज्याबद्दलचे शब्द आणि थेट युद्धभूमीवर मोगलांना सळो की पळो करून सोडणारे त्यांचे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व साकारणे हे शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे. त्यामुळेच या भूमिकेसाठी अत्यंत कठीण अशा ऑडिशन्स घेण्यात आल्या होत्या. राज्यभरातून तब्बल चारशे ऑडिशन्समधून, ज्यात अनेक नामवंत ते नवोदित अभिनेत्री आवर्जून सहभागी झाल्या होत्या. त्यातून स्वरदा ठिगळे या अभिनेत्रीची निवड ताराराणींची मध्यवर्ती भूमिका साकारण्यासाठी करण्यात आली.

मराठी मनोरंजनक्षेत्रात आपला वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटवणारी स्वरदा, अभिनयाबरोबरच घोडेस्वारी आणि तलवारबाजीमध्ये निपुण असून या ऐतिहासिक मालिकेच्या निमित्ताने तिने पुन्हा एकदा कसून सरावाला सुरुवात केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यानंतर स्वराज्य अबाधित राखून ते वर्धिष्णू करणाऱ्या अपरिचित जाज्वल्य इतिहासाचे पर्व ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेत उलगडणार आहे. येत्या १५ नोव्हेंबरपासून ही मालिका सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Artemis 2 mission: ऐतिहासिक क्षण! ५० वर्षांनंतर मानव पुन्हा चंद्राकडे; मानवाच्या इतिहासातील सर्वात दूरचा अंतराळ प्रवास

Divyang Students: राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय! दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत भरीव वाढ; अभ्यास दौऱ्यासाठी मिळणार अर्थसाह्य..

Latest Marathi News Live Update : हनुमान जयंतीनिमित्त नाशिकच्या अंजनेरीत भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी

Chhatrapati Sambhajinagar: अजिंठा घाटात ट्रक अपघात, वाहतूक सुमारे एक तास ठप्प; पंढरपूर-जळगाव ट्रकचा ब्रेक फेल; समोरील ट्रकला धडक

US Iran Conflict End : ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य! इराण युद्ध संपण्याच्या उंबरठ्यावर, इस्रायल, यूएई, सौदीचे मानले आभार

SCROLL FOR NEXT