tejaswini pandit file photo
मनोरंजन

‘देशाला लागलेली कोरोनापेक्षा भयानक किड म्हणजे राजकारण’

तेजस्विनी पंडितने व्यक्त केला संताप

सकाळ डिजिटल टीम

देशात कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनेचा सामना देश करत आहे. संक्रमित रूग्णांची संख्या वाढत असल्याने हॉस्पिटलमध्ये रूग्णांना बेड उपलब्ध होत नाहित. तसेच रेमडेसिवीर औषधाची कमतरता, ऑक्सिजनचा तुटवडा अशा अनेक समस्यांचा सामना सामान्य जनतेला करावा लागत आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडितने याचबाबत एक पोस्ट सोशल मीडियावर लिहिली आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तेजस्विनीने कोरोना आणि त्यामागे चालत असलेले राजकारण या संदर्भात इन्स्टा स्टोरीमध्ये पोस्ट लिहिली आहे. 'सगळ्यात मोठी कीड जर आपल्या देशाला, आपल्याच नाही, तर सगळ्या जगाला लागली आहे, ती आहे राजकारण. ही कीड कोविडपेक्षा भयाण, घातक आणि वर्षानुवर्षे आपल्याला पोखरत जाणारी आहे. या कीडपासून बचाव करता आला तर बघा! अवघड आहे सगळंच…काळजी घ्या’, असं तिने लिहिलं. सध्या देशात कोरोनाचा कहर पण त्यापेक्षा भयानक आहे ते म्हणजे देशातील आणि जगातील राजकारण असे तेजस्विनीने राजकारणाबद्दलचे मत या पोस्टमधून मांडले आहे. .

हेही वाचा : कुंभमेळ्याच्या आयोजनावरुन सोनू निगमचं मोठं विधान

गेल्या २४ तासांत देशात २ लाख ६१ हजार ५०० करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर याच कालावधीत १ लाख ३८ हजार ४२३ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. देशासाठी चिंतेची बाब म्हणजे मृतांच्या संख्येत २४ तासांतच मोठी वाढ झाली आहे. देशात १ हजार ५०१ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण मृतांची संख्या १ लाख ७७ हजार १५० वर पोहोचली आहे. ही परिस्थिती गंभीर असूनही राजकारण करण्याऱ्या लोकांबद्दल तेजस्विनीने संताप व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fifa World Cup 2026 : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावाची फक्त 'हवा'! बलाढ्य पोर्तुगालला ५२ वर्षांनी वर्ल्ड कप खेळणाऱ्या काँगोने रडवले, धक्कादायक निकाल

T20 WC: धक्कादायक! भारताच्या प्रमुख खेळाडूला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले... सर्व खेळाडू तिच्याभवती जमले, चिंता वाढवणारी घटना

Monsoon Tourism: पावसाने दडी मारताच ताम्हिणी घाट-देवकुंड पर्यटन ठप्प; अंधारबन, खजिना ट्रेकवर शुकशुकाट

Donald Trump: ''नरेंद्र मोदी पंतप्रधान असेपर्यंत भारतावर हल्ला झाला तर..'', डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान अन् जगभरातील नेत्यांच्या भूवया उंचावल्या

‘बी-२’चा ‘जीआर’ महिनाभरात! सोलापुरातील १२५ वर्षे जुन्या चाळींमधील प्रत्येक कुटुंबास मिळणार काही हजारांत जागेची मालकी; आमदार देवेंद्र कोठेंचा यशस्वी पाठपुरावा

SCROLL FOR NEXT