Vishal Nikam with his Mother Google
मनोरंजन

मराठी 'बिग बॉस 3' विनर विशाल निकम आईच्या आठवणीत झाला भावूक

सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत म्हणाला...

प्रणाली मोरे

'मराठी बिग बॉस सिझन 3' चा विनर विशाल निकम(Vishal Nikam) सध्या चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरात खरा माणूस बनून खेळलो म्हणूनच आपण जिंकलो अन् संबंध महाराष्ट्राला आवडू लागलो असं विशालनं विजेतेपद पटकावल्यानंतर आपल्या प्रत्येक मुलाखतीतून सांगितलं आहे. सोशल मीडियावर सध्या विशाल अधिक सक्रिय आहे. त्याने बिग बॉसचं विजेतेपद पटकावल्यानंतर तडक त्याचं गाव गाठलं होतं. गावातल्या काही आवडत्या जागांची भेट त्यानं त्याच्या चाहत्यांना व्हिडीओ पोस्टच्या माध्यमातून करून दिली होती. आता पुन्हा त्यानं आपल्या आईच्या आठवणीत एक व्हिडीओ पोस्ट केलाय ज्यामुळे त्याच्यासोबत त्याचे चाहतेही भावूक झालेले दिसत आहेत.

शूटिंग निमित्तानं विशाल हा आपल्या कुटुंबापासून लांब राहतो. अर्थात अनेक कलाकारांना आपल्या कामाच्या निमित्तानं घरापासून वेगळं राहावं लागतच. विशालही त्याला अपवाद नाही. विशालनं आईसोबतच्या व्हिडीओ कॉलला रेकॉर्ड करून तो पोस्ट केलेला आहे. त्या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला 'मेरे मॉं के बराबर कोई नही' हे गाणं ऐकू येत आहे. त्या पोस्टला कॅप्शन देताना त्यानं लिहिलं आहे,''मिस यू मॉं''.आणि सोबत हार्ट इमोजीही पोस्ट केले आहेत. त्याच्या या पोस्टवर त्याच्या चाहत्यांनीही प्रतिक्रिया देत आईच्या प्रेमाविषयी आपल्या भावनाही कमेंट बॉक्समध्ये लिहिल्या आहेत. विशाल लवकरच एका मराठी सिनेमातून आपल्याला मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs ZIM : वेस्ट इंडिज-झिम्बाब्वे लढतीचा निकाल टीम इंडियाचं टेंशन वाढवणार; सूर्याचा संघ Semi Final च्या शर्यतीतून बाहेर होणार

Operation Bajrang: मथुरेत २५० जवानांनी गावाला घातला वेढा; मिनी जमतारातून ३४ सायबर भामटे गजाआड, तर ४५ जण शेतातून पळाले

५०० रुपयात कुणासोबतही झोपता, तर माझ्या पतीसोबत...; दिल्लीत तरुणींसोबत दाम्पत्याचं गैरवर्तन

Latest Marathi News Live Update : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना नांदेड भूषण पुरस्कार प्रदान

Nashik Accident : बापाच्या डोळ्यादेखत पोटचा गोळा गेला! नाशिकमध्ये भरधाव कारच्या धडकेत दहावीचा विद्यार्थी ठार

SCROLL FOR NEXT