Marathi Bigg Boss 4: कलर्स वाहिनीवर गेल्या तीन महिन्यांपासून सुरु असलेल्या एका वादळी पर्वाचा शेवट अखेर झाला आहे. अर्थात बिग बॉस मराठी ४ सिझनचा फिनाले दणक्यात पार पडला.
पण शेवट हवा तसा गोड झाला नाही अशा प्रतिक्रिया सर्वत्र उमटताना दिसत आहेत. सोशल मीडियावर तर लोकांनी विजेता जाहीर करण्यात मोठा घोळ झालाय असंच म्हणायला थेट सुरुवात केली आहे.
विजेता ठरलेला अक्षय केळकर विजेता म्हणून कोणाच्याच चर्चेत नसताना आयत्यावेळेला गेम कसा पलटला? कोणी पलटवला? यावरनं प्रश्नचिन्ह नाही लोक थेट नाव घेत आरोप करताना दिसत आहेत. चला जाणून घेऊया त्याविषयी थोडक्यात...(Marathi Bigg Boss 4: Akshay Kelkar- winner)
अक्षय केळकर हे नाव विजेता म्हणून सर्वसामान्य प्रेक्षकच काय तर मनोरंजन इंडस्ट्रीतील कलाकारांनी लावलेल्या अंदाजांमध्ये देखील सामिल नव्हतं. त्यामुळे तो विजेता ठरल्यावर शो च्या विजेत्यावरनं प्रश्न निर्माण होणं स्वाभाविक आहे.
पण हे असं बोलणारे कोणी किरण माने किंवा अपूर्वाचे चाहते नव्हेत तर आपल्या नजरेतून शो चं परिक्षण करणारे सर्वसामान्य प्रेक्षक आहेत.
अक्षय केळकर विजेता बनला म्हणून लोकांनी थेट आरोप केलेयत ते शो च्या मेकर्सवर...सगळा गेम त्यांनीच ठरवलेला होता अशा प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.
कुणी लिहिलंय, 'प्रेक्षकांना नाही makers ना धन्यवाद,कारण अक्षयला winner करून प्रेक्षकांचा अपमान केला गेला आहे..'
तर कुणी म्हटलं आहे,'काहीही म्हणा बीबी ४ ची मेहरबानी होती म्हणून अक्षय जिंकला, त्याच श्रेय खर तर बीबी ला जातं..', कुणा एकानं लिहिलंय,'मला तर वाटतं हे पॉलिटिक्स झालंय सागळ्यात जास्त..'....या काही लोकांच्या प्रातिनिधिक प्रतिक्रिया आम्ही इथे देत आहोत.
पण अशा प्रतिक्रियांचा खच्च पडलाय सोशल मीडियावर...
तुम्हाला काय वाटतं खरंच अक्षय केळकर विजेतेपदी योग्य नव्हता? कमेंट बॉक्समध्ये आपलं मत अपेक्षित आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.